Health Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video
Woman Workout (Photo Credits: Pxhere Pixabay)

महिलांना येणारी मासिक पाळी (Menstruation) ही जरी नैसर्गिक असली तरी या पाळीदरम्यान महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. अशा वेळी पोटदुखी (Stomach Pain), कंबरदुखी, पाठदुखी (Back Pain) यांसारखे शरीरासंबंधीचे अनेक त्रास उद्भवतात. त्याचप्रमाणे चिडचिडेपणा, अस्वस्थपणा यांसारखे मानसिक आजारही यावेळी डोकं वर काढतात. अशा वेळी प्रत्येक महिलेने अथवा मुलींनी या दिवसात स्वत:ची आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या दिवसात तुमचे मन प्रसन्न राहण्यासाठी तसेच मानसिक त्रास कमी होण्यासाठी तुम्ही थोड्या सोप्या पद्धतीने व्यायाम (Exercise) करु शकता.

अनेकदा रोज Workout करणा-या महिला या दिवसात व्यायाम करणे टाळतात. कारण त्यांचे शरीर मासिक पाळी मुळे अशक्त झालेले असते. थोडा थकवा आलेला असतो. त्यामुळे अशा दिवसात तुम्ही काही सोप्या आणि जास्त हालचाल नसलेला व्यायाम केल्यास तुमचा पाळीदरम्यान त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. मासिक पाळी लांबविण्यासाठी गोळ्यांऐवजी सेवन करा या '5' नैसर्गिक आणि पौष्टिक गोष्टी

पाहा काही व्हिडिओज

मासिक पाळीत कोणतेही वर्कआऊट करताना पोटावर जास्त दाब देऊ नका. यामुळे ज्यांना या दिवसात अंगावर जास्त स्त्राव जात असेल तर त्यांना तो त्रास आणखीन जाणवू शकतो. त्यामुळे तुमचे अंग जास्त न ताणता थोडे ढिलच सोडा.

मासिक पाळी दरम्यान महिलांना होणारा त्रास हा कधी कधी असह्य करणारा अशतो. त्यामुळे अशावेळी तुम्ही योग्य ती काळजी घेऊन असे सोपे आणि नॉर्मल वर्कआऊट करु शकता. ज्यामुळे तुमचे रोजचे वर्कआऊट स्किपही होणार नाही आणि Period दरम्यान होणारा त्रास कमी होईल.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)