मासिक पाळी लांबविण्यासाठी गोळ्यांऐवजी सेवन करा या '5' नैसर्गिक आणि पौष्टिक गोष्टी
Woman Period (Photo Credits: PixaBay)

मासिक पाळी (Monthly Period Problem) हा स्त्रियांमध्ये असणारी सामान्य शारीरिक घटना असली तरी पाळीच्या संबंधात अनेक तक्रारी असतात. त्यासाठी कधीकधी सल्ल्याची व उपचाराची गरज भासते. अनेक महिलांनी किंवा मुलींना मासिक पाळी दरम्यान पोटदुखीचा त्रास होणे, कंबर दुखणे, अशक्त वाटणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. सध्याच्या जगात लाईफस्टाईल बदलत चालल्यामुळे खाण्या-पिण्याच्या वेळा, आपण काय खातो यावरही मासिक पाळीचा परिणाम होत असतो. यामुळे घरातील शुभकार्यासाठी किंवा कुठे बाहेर जायचे आहे यासाठी महिला अनेकदा मुली मासिक पाळी पुढे जाण्यासाठी किंवा लवकर येण्यासाठी अनेक औषधांचे सेवन करतात, ज्याच ब-याचजा त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होतो.

मासिक पाळी लवकर येण्यासाठी जसे काही नैसर्गिक उपाय आहेत तसेच मासिक पाळी पुढे जाण्यासाठीही बरेच नैसर्गिक उपाय आहेत. ज्याने स्त्रियांच्या शरीरावर कोणताही विपरित परिणाम होणार नाही. पाहूयात कोणत्या आहेत या '5' गोष्टी:

1. कलिंगड:

कलिंगड हे फळ निसर्गत: थंड असल्याने त्याचा शरीरात थंडावा निर्माण होतो. जेणे करुन तुमची मासिक पाळी पुढे जाण्यास मदत होऊ शकते.

2. काकडी:

काकडीमध्येही भरपूर प्रमाणात पाणी आणि थंड असल्या कारणाने याचा फायदा पाळी पुढे जाण्यासाठी होतो. तसेच ही खाण्याने शरीरावर कोणताही परिणाम न होता त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन मिळतात.

3. डाळिंब:

डाळिंबाच्या सालींना कोरडे करुन त्याची पावडर बनवा. एक चमचा पावडर पाण्यात टाकून रोज सकाळ-संध्याकाळ त्याचे सेवन केल्याने मासिक पाळी उशिराने येते.

हेदेखील वाचा- Winter Lips Care Tips: हिवाळ्यात या '5' घरगुती उपायांनी घ्या गुलाबी ओठांची काळजी

4. पुदिना:

मासिक पाळी लांबविण्यासाठी दिवसातून दोनदा पुदीनाचा रस पिणे फायदयाचे ठरू शकते.

5. आवळा:

आवळ्याची पावडर किंवा रसाचे सेवन केल्याने मासिक पाळी उशिराने येते तसेच पाळीमुळे होणारा त्रासही कमीही होतो.

शरीराल हानिकारक ठरतील अशा गोळ्या घेण्यापेक्षा वरील सांगितलेल्या 5 उपायांनी तुम्ही मासिक पाळी लांबवू शकता.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)