अचानक आलेले पिंपल्स दूर करण्यासाठी ट्राय करा हे '5' घरगुती उपाय !
पिंपल्स (Photo Credits: Kjerstin_Michaela/pixabay)

अनेकदा सणवार, समारंभ जवळ आले की अचानक चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागतात. चेहऱ्यावर पिंपल्स बघताच तरुणींचा मूड ऑफ होतो. मग त्यावर वेगवेगळे उपाय केले जातात. पण अनेकदा त्याच्या फायदा होण्याऐवजी साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी काही नैसर्गिक घरगुती उपाय उपयुक्त ठरु शकतात.  तर जाणून घेऊया अचानक आलेल्या पिंपल्ससाठी नेमके काय करावे?

मध

मधात थोडीशी दालचिनी पावडर घाला आणि ही पेस्ट झोपण्यापूर्वी पिंपल्सवर लावा. रात्रभर ठेवा. सकाळी कोमट पाण्याने चेहरा साफ करा. दालचिनीत अॅंटी मायक्रोबिअल गुणधर्म असतात आणि मध त्वचेला तजेला देते.

लिंबू

लिंबात अॅंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात. लिंबाचा रस पिंपल्सवर लावा. रात्रभर तसाच ठेवून सकाळी चेहरा स्वच्छ धुवा. लिंबाच्या रसामुळे चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, पिंपल्स स्पॉट्स कमी होण्यास मदत होते.

लसूण

रक्तातील विषद्रव्ये दूर करण्यास लसूण फायदेशीर ठरतं. पिंपल्स दूर होऊन त्वचा तजेलदार दिसू लागते. त्यासाठी लसूण सोलून पिंपल्सवर लावा किंवा लसणाच्या पाकळ्या वाटून दह्यात घालून पिंपल्सवर लावा.

टॉमेटो

टॉमेटोचा रस काढून चेहऱ्याला लावा. त्वचा अधिक कोरडी असल्यास टॉमेटोच्या रसात थोडे पाणी मिसळा आणि लावा.

हळद

भारतीय महिला त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी उटण्याचा वापर करतात. हळदीचा लेप चेहऱ्याला लावल्याने त्वचा तजेलदार होते. त्याचबरोबर हळदीचे दूध प्यायल्यानेही त्वचा आतून साफ होते.