Side Effects Of Using Headphones: कानाला हेडफोन (Headphones) लावून संगीत ऐकण्याच्या सवयीचा जर तुमच्याकडून अतिरेक होत असेल तर, वेळीच सावध व्हा. केवळ कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत रात्रभर झोपल्याने एका युवकाला बहिरेपण (Deafness) आल आहे. प्राप्त माहितीनुसार, रात्री झोपण्यापूर्वी हा युवक सामान्य होता. त्याला सर्व काही ठिक ऐकू येत होते. मात्र, हेडफोन लावून तो गाणी ऐकत झोपला आणि सकाळी उठून पाहतो तर तो ठार बहिरा (Deaf) झाला होता.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना तैवान देशातील ताईचुंग येथे घडली. येथील एक युवकाला हेडफोन लावून गाणी ऐकण्याची सवय होती. तो कानाला हेडफोन लावून सातत्याने गाणी ऐकत असे. अगदी रात्री झोपतानाही तो कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत तो झोपत असे. ही घटना घडली त्या रात्रीही तो नेहमीप्रमाणे कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत झोपला होता. सकाळी उठून पाहतो तर, त्याला एका कानाने काहीच ऐकू येत नव्हते.
दरम्यान, डेलिमेल या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या विद्यार्थ्यावर तैवान येथील आशिया विद्यापीठातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या विद्यार्थ्याच्या बाबतीत घडलेली एक चांगली गोष्ट अशी की, रात्री झोपेत त्याच्या एका कानातील हेडफोन निघून पडला. त्यामुळे हेडफोन निघालेला कान सुरक्षित राहीला. त्याच्या दुसऱ्या कानातही पहिल्यासारखाच हेडफोन असता तर, कदाचित त्याच्या दुसऱ्या कानालाही बहिरेपणा आला असता, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले आहे. (हेसुद्धा वाचा, हेडफोन लावल्यावर डिस्टर्ब करणाऱ्या WhatsApp नोटीफिकेशनचा दाबा गळा; हा पर्याय सोपा)
दरम्यान, न्यूयॉर्क विद्यापीठाने 2018 मध्ये एक सर्वे केला होता. या सर्व्हेमध्ये म्हटले होते की, जगभरातील तरुणांमध्ये हेडफोन वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकी पाच तरुणांमागे एका तरुणाची आवाज ऐकण्याची क्षमता कमी होत चालली आहे. त्यामुळे तुम्हीही काळजी घ्या.