हेडफोन लावल्यावर डिस्टर्ब करणाऱ्या WhatsApp नोटीफिकेशनचा दाबा गळा; हा पर्याय सोपा
WhatsApp Notifications | (Photo credit: archived, edited, symbolic images)

How to Stop WhatsApp Notifications: कानाला हेडफोन लाऊन आपले आवडते गीत, संगीत, पुस्तक किंवा तसेच काहीतरी नाटक, भाषण ऐकण्याची मजा काही औरच. ही मजा अनुभवताना व्हॉट्सअॅप, हॅंगआऊट, फेसबुक, ट्विटर आदी अॅप नोटीफिकेशन्समुळे येणारा अडथळा कमालीचा त्रासदायक असतो. अशा वेळी गाणी न ऐकण परवडलं खरं ती नोटीफिकेशन्स (Notifications) नको, अशी आवस्था होऊन जाते. पण, करणार काय? आपल्यापैकी अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. किंवा वैतागून हेडफोन लाऊन ऐकणेच बंद करतात. अशा वेळी तुम्ही काय करता? वैतागता? दुर्लक्ष करता? सरावाने या त्रासाला सरावले जाता? की फोन सायलेंट मोडवर टाकता? जाऊ दे, काळजी करु नका. आज आम्ही आपल्याला सांगत आहोत WhatsApp नोटीफिकेशन बंद करण्याची खास पद्धत. जी देईल नोटीफिकेशनपासून मुक्ती. काहींची समस्या अशी की, त्यांना नोटीफिकेशनच येत नाहीत. तर ती सुरु करायची असतील तर त्याबाबतही इथे तुम्ही जाणून घेऊ शकता.

नोटीफिकेशनच्या त्रासाला कंटाळून आपण अनेकदा फोन सायलेंट मोडवर टाकण्याचा प्रयत्न करतो. पण, तरीही शांत बसेल ते WhatsApp नोटीफिकेशन कसले. WhatsApp बंद किंवा सुरु करण्याची एक खास पद्धत आहे. ती वापरण्यासाठी तुम्हाला पुढील पायऱ्यांचा आधार घ्यावा लागेल.

पहिल्यांदा WhatsApp सुरु करा. इथे सेटींगमध्ये जा. इथे तुम्हाला मेसेजेस नोटीफिकेशन हा ऑप्शन दिसेल. इथे तुम्हाला वेगवेगळी नोटीफिकेशन्स दिसतील. त्यापैकी कोणत्याही ऑप्शनवर क्लिक करा तर तुम्हाला फाईल मॅनेजर आणि मीडिया स्टोअर असे दोन पर्याय दिसतील. इथे तुम्ही मीडिया स्टोअरमधून तुम्हाला आवडत असलेली एखादी नोटीफिकेशन टोन निवडू शकता.

पुढे तुम्हाला व्हायब्रेशन हा ऑपश दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करुन तुम्ही काही पर्याय पाहू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे इथे व्हायब्रेशन ऑफ किंवा इतर कोणाताही पर्याय निवडू शकता. ऑफ पर्याय स्वीकारल्यास तुमचा फोन WhatsApp नोटीफिकेशन नंतर व्हायब्रेट होणार नाही. (हेही वाचा, Happy Women's Day: WhatsApp कडून जागतिक महिला दिनानिमित्त खास Stickers ची भेट)

WhatsApp नोटीफिकेशनचा गळाच दाबायचा असल्यास हा पर्याय आहे सोपा!

WhatsApp मधून बाहेर पडा. फोन सेटीग्जमध्ये या. इथे तुम्हाला App नावाचा ऑप्शन दिसेल. हा ऑप्शन उघडताच तुम्हाला WhatsApp शोधायचे आहे. आता WhatsApp वर क्लिक करा. इथेही तुम्हाला वेगवेगळे पर्या दिसतील. पण, तुम्हाला नोटीफिकेशन हाच ऑप्शन निवडायचा आहे. आता तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात. जर तुम्हाला व्हॉट्सअॅप नोटीफिकेशन बंद करायचे असतील तर, ब्लॉक ऑल हा ऑप्शन ऑफ करा. नोटीफिकेशन सुरु करायची असतील तर ऑन करा. हा ऑप्शन वापरल्यानंतर तुमचा फोन किंवा इंटरनेट दिवसभर जरी सुरु असला तरी, तुम्हाला नोटीफिकेशन्सचा त्रास होणार नाही.