प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Happy Women's Day: आज 8 मार्च रोजी जागतिक स्तरावर महिला दिन साजरा केला जात आहे. तसेच प्रत्येक महिलेचा आदर करणे ही सर्वात मोठी बाब असल्याचे मानले जाते. त्यामुळे आज व्हॉट्सअॅप (WhatsApp) कडून ही जागतिक महिला दिनानिमित्त खास स्टिकर्सची भेट देण्यात आली आहे.

तसेच मेसेजपेक्षा सध्या स्टिकर्सच्या माध्यमातून आपल्या भावना काही सेकंदात समोरच्या व्यक्तीकडे मांडता येतात. बदलत्या काळात व्हॉट्सअॅप हे सध्या जगप्रसिद्ध अॅप बनले आहे. तर तुम्हाला माहिती आहे का या काही महिलांनी व्हॉट्सअॅपचे स्टिकर्स बनवण्यात त्यांचे मोलाचे अनुदान दिले आहेत. तर पाहूयात कोण आहेत या महिला ज्या व्हॉट्सअॅप मधील स्टिकर्सच्या माध्यमातून आपल्याला भावना दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्यास मदत करतात. (हेही वाचा-International Women's Day 2019: 8 मार्चला का साजरा केला जातो जागतिक महिला दिन? कशी झाली सुरुवात?)

श्रेया डुडल (Shreya Doodles)

भारतात राहणारी श्रेया हिने सध्या युजर्सची मने तिच्या डुडलच्या माध्यमातून जिंकली आहेत. तसेच सध्या श्रेया हिचे इन्स्टाग्रामवर 212K फॉलोअर्स झाले आहेत. श्रेया हिचे डुडल अॅन्ड्रॉईड फोनच्या व्हॉट्सअॅपसाठी उपलब्ध आहेत.

सॉल्टी (Salty)

सॉल्टी हे फन स्टिकर्स तयार करत असून व्हॉट्सअॅप प्रोडक्ड डिझानयर अलिसा के याबाबत असे म्हणते की, तुमच्या व्यक्तिमत्वाचा आदर यामधून दाखऊ शकता. अलिसा हिने व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव अनुभवले जातात त्यामधूनच तिला ही प्रेरणा मिळाली आहे. हे स्टिकर्सचे पॅक iOS आणि अॅन्ड्रॉईड फोनसाठी उपलब्ध आहेत.

निडर आणि मोहक (Fearless & Fabulous)

निडर आणि मोहक या दोन गोष्टी अशा आहेत की, त्यामुळे आपण खंबीर,शक्तीशाली आणि वैविध्यपूर्ण महिला असल्याचे दाखवून दिले जाते. अॅन शेन डिझायनर आणि इलॅस्ट्रेटरच्या माध्यमातून स्टिकर्स बनवले जातात. त्यामध्ये त्याने दृढनिश्चय, भावना आणि प्रेम व्यक्त करणारे स्टिकर्स बनवतात. हे स्टिकर्स तुम्हाला आयओएस आणि अॅन्ड्रॉईड फोनसाठी उपलब्ध आहेत.

नारीवादी (Feminist)

प्रसिद्ध नारीशक्ती अशी प्रेरणा असणारी माया एंजेलू हे याचे उत्तम उदाहरण आहे. तिच्याकडे प्रत्येक नारीशक्ती दाखवणाऱ्या स्टिकर्सचा संग्रह आहे. तर हे स्टिकर्स तुम्हाला अॅन्ड्रॉईड फोनसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

दिबूहॅनदो लॉस दियास (Dibujando los días)

हे स्टिकर्सचे पॅक मॅक्सिकन कलाकार मेऊली हिने बनवले आहेत. व्हॉट्सअॅपच्या या स्टिकर्समध्ये व्यक्तीच्या कोणत्याही भावनेचा स्टिकर्स उपलब्ध आहे. तर अॅन्ड्रॉईड फोनसाठी तिच्या स्टिकर्सची सुविधा दिली आहे.

सर्वप्रथम 1909 मध्ये 'जागतिक महिला दिन' साजरा केला गेला. मात्र 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने एका थीमसह महिला दिन साजरा करण्याची प्रथा सुरु केली. तेव्हापासून याला अधिकृत मान्यता मिळाली. महिला दिनाची पहिली थीम होती- 'सेलिब्रेटींग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्युचर.'