Hangover Day 2020: दारूची झिंग उतरविण्यासाठी कामी येतील हे '5' झटपट उपाय
Hangover Cure Tips (Photo Credits: PixaBay)

Best Hangover Cure Tips: थर्टी फर्स्ट म्हटलं की मद्यपान करणे हे ओघाओघाने आलेच. मद्यपान केल्याशिवाय थर्टी फर्स्ट पूर्णच होणार नाही असे अनेकांचा स्वघोषित समज आहे. म्हणूनच की काय 1 जानेवारी हा दिवस Hangover Day म्हणून साजरा केला जातो. 31st डिसेंबरच्या अति मद्यसेवनाने अनेकांनी दारूची झिंग चढते. ही झिंग उतरविण्यासाठी अनेकांने नानाविध उपाय करावे लागतात. त्यात अनेकांना 1 जानेवारीला सुट्टी नसल्याने निमूटपणे कामावर जावे लागेल. अशा वेळी मद्याच्या अतिसेवनामुळे काही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून नेमकं काय करावं असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

हीच गोष्ट लक्षात घेता मद्यपानाचे अतिसेवन करणा-यांसाठी मद्याची झिंग उतरवण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे '5' घरगुती टिप्स देणार आहोत.

1) हँगओव्हर उतरवण्यासाठी कॉफी हा लोकप्रिय उपाय आहे. एक कप कडक कॉफीमुळे हॅंगओव्हर गायब होते. एकाच वेळी कॉफी पिण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने अर्धा अर्धा कप कॉफी प्या. यामुळे सुस्ती दूर होऊन डोकेदुखीवर आराम मिळतो.

हेदेखील वाचा- New Year's Eve 2019: मुंबईकरांचे 31 डिसेंबर सेलिब्रेशन स्पेशल करण्यासाठी BEST बस, लोकल ते हॉटेल, बार पर्यंत 'या' सुविधा मध्यरात्री पर्यंत राहणार सुरु

2) दह्यापासून बनलेली लस्सी हॅंगओव्हर उतरवण्यास मदत करते

3) मद्याची नशा उतरवण्यासाठी आल्याचा चहा प्या. यामुळे डोकेदुखीवर आराम मिळेल.

4) हॅंगओव्हर उतरवण्यासाठी तुम्ही संत्र्याचा रस घेऊ शकता. यातील व्हिटॉमिन सी मुळे उलटी, मळमळ यावर आराम मिळतो.

5) नारळाचे पाणी पिऊन तुम्ही हॅंगओव्हर उतरवू शकता.

या झटपट टिप्स तुम्हाला हँगओव्हर उतरविण्यासाठी नक्की कामी येतील. याचा अर्थ तुम्ही मनसोक्त मद्यपान करा असेही नाही बरे. तर ते नियंत्रणात ठेवून केलेलेच अति उत्तम.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)