गोवर-रुबेला लसीकरण मोहीम आजपासून सुरु; ३.३८ कोटी बालकांना लाभ देण्याचे आरोग्य विभागाकडून उद्दिष्ट
लसीकरण (Archived, edited, representative image)

Gover Rubella Vaccination Campaign in Maharashtra: गोवर आणि रुबेला हे आजार समूळ नष्ट करण्यासाठी राज्याचा आरोग्य विभागाची पूर्व नियोजित मोहीम आजपासून (मंगळवार, २७ नोव्हेंबरापसून सरु होत आहे. ही मोहीम अत्यंत व्याप्त स्वरुपात राबविण्यात येणार आहे. तसचे, या मोहिमेंतर्गत तब्बल ३.३८ कोटी बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याचाच अर्थ असा की, आरोग्य विभागाच्या मोहिमेचे उद्दीष्ट सफल झाले तर राज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना या लसिकरणाचा लाभ होणार आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच, ती नऊ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या बालके आणि मुलांना देण्यात येणार आहे.

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी ही लस आपल्या बाळांना टोचून घ्यावी असे अवाहन सर्व पालकांना केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, पालकांनी ही लस यापूर्वीही जरी आपल्या बाळांना दिली असली तर, अतिरिक्त संरक्षण म्हणून त्यांनी ही लस आपल्या बाळांना पुन्हा द्यावी. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवन प्रांगणात या मोहिमेची सुरुवात आज सकाळी ९.३० वाजता होणार आहे.

गोवर निर्मूलन व रुबेला लस कोठे उपलब्ध होऊ शकेल?

  • पहिले दोन ते तीन आठवडे तालुक्यातील सर्व शाळांमध्ये लसीकरण सत्राचे आयोजन
  • उर्वरित ३५ ते ४०टक्के लाभार्थींसाठी अंगणवाडी केंद्र व नियमित लसीकरण, उपकेंद्र येथे गोवर

    रुबेला लसीकरण उपलब्ध

  • मोहिमे अंतर्गत सर्व लाभार्थींना गोवर रुबेला लसीचे एक इंजेक्शन देण्यात येणार.

गोवरमुळे होणारे संभाव्य आजार

 बालमृत्यू, आंधळेपणा, मेंदूज्वर ,मोतिबिंदू, हृदयविकार, मतिमंदत्व, बहिरेपणा व शरीराची वाढ खुंटणे इत्यादी आजार गोवरमुळे होऊ शकतात. (हेही वाचा, गोवर रुबेला लसीकरण मोहीम येत्या २७ नोव्हेंबरपासून सुरु; राज्यभरातील आठ लाख बालकांना लाभ देण्याचे उद्दीष्ट)

प्राप्त माहितीनुसार, केवळ गोवर या आजारामुळे भारतात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे ५० हजारांच्या आसपास आहे. महत्त्वाचे असे की, या आजाराची लागन गर्भवती महिलेस झाल्यास तिचा गर्भपात होण्याचा धोका वाढतो. तर, रुबेला हा आजार पूर्णपणे संसर्गजन्य आहे. त्यामुळे रुबेला आजार झालेल्या व्यक्तिच्या सानिध्यात येताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात. आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी ही लस टोचून घेणे आवश्यक असल्याचेही आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या वेळी सांगितले.