थंडीचा गारठा जाणवू लागला आहे. हा गारवा सुखावणारा असला तरी हिवाळ्यात सर्दी-खोकला यांसारख्या लहान-सहान समस्याही डोके वर काढू लागतात. त्याचबरोबर लहान मुलांची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे थंडीच्या दिवसात फिट राहण्यासाठी आहारातही विशेष बदल करणे आवश्यक आहे. आहारात विशिष्ट पदार्थ समाविष्ट केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. परिणामी आजारांना आळा बसतो. म्हणून थंडीच्या दिवसात हेल्दी राहण्यासाठी आहारात काही 5 पदार्थांचा अवश्य समावेश करा.
बीट
बीटात भरपूर प्रमाणात आयर्न असते. त्यामुळे रक्तवाढीस मदत होते. यात असलेल्या व्हिटॉमिन ए, बी, बी1, बी2, बी6, व्हिट़ॉमिन सी, सोडिअम, पोटॅशियम, फास्फॉरस, क्लोरीन आणि आयोडिन यांसारखे पोषकघटक असतात. त्यामुळे हिवाळ्यात हेल्दी राहण्यासाठी बीट अत्यंत फायदेशीर ठरते.
गाजर
गाजरात व्हिटॉमिन ए, बी, सी, कॅल्शियम आणि पेक्टीन यांसारखे अनेक व्हिटॉमिन्स आणि मिनरल्स असतात. गाजराच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रोलचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास गाजर फायदेशीर ठरते.
आवळा
आवळ्यात व्हिटॉमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात हेल्दी राहण्यास मदत होते. व्हिटॉमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अँटीऑक्सीडेंट शरीरातून टॉक्सिन्स (विषद्रव्ये) बाहेर टाकण्यास मदत होते. त्याचबरोबर ब्लड शुगर नियंत्रित राहते आणि अॅनिमियापासून बचाव होतो.
हिरव्या पालेभाज्या
हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्यांमधून शरीराला आवश्यक ते पोषकघटक योग्य प्रमाणात मिळतात. त्यामुळे हिवाळ्यात आहारात हिरव्या पालेभाज्या असू द्या.