मोड आलेले सर्वचं कडधान्य (Sprouts) पौष्टिक आणि चविष्ट लागतं. रोज सकाळी मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने आपल्या शरीराला आरोग्यदायी फायदे मिळतात. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात मोड आलेल्या धान्याचा समावेश असणं आवश्यक असतं. सकाळी उठल्यावर नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्ये खाल्ल्याने शरीराला प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतात.
मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने आपली अनेक आजारांपासून सुटका होते. चला तर मग आज या लेखातून रोज सकाळी मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने आपल्याला कोणते आरोग्यदायी फायदे होतात हे जाणून घेऊयात...(हेही वाचा - Monsoon Home Care Tips: पावसाळ्यात घरात माशांचं प्रमाण वाढलयं ? करा 'हे' उपाय)
डोळ्यांचे आरोग्य सुधारते -
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज मोड आलेले कडधान्य खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. मोड आलेले धान्य खाल्ल्याने तुमची दृष्टी सुधारते तसेच डोळ्यांच्या सर्व विकारापासून तुमची सुटका होते.
वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय -
तुम्ही जर वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल तर, दररोज सकाळी तुमच्या आहारात अंकुरित धान्यांचा समावेश करा. मोड आलेल्या कडधान्यात मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. त्यामुळे तुमचं पोट लवकर भरतं. तसचं तुम्हाला लवकर भुक लागत नाही. परिणामी तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.
पचनक्रिया सुधारते -
तुम्हाला जर अन्न अपचनाचा त्रास होत असेल तर, रोज सकाळी मोड आलेले धान्य खा. अंकुरित धान्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स असतात. त्यामुळे पचकक्रिया व्यवस्थित होते.
रोगप्रतिकार शक्ती वाढते -
मोड आलेल्या कडधान्यांच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. परिणामी शरीर निरोगी राहण्यास मदत होते. (हेही वाचा - बाबा रामदेव यांच्या पतंजली ने कोरोना व्हायरस औषधासंदर्भात केला मोठा दावा; गुळवेल, अश्वगंधा ने कोविड-19 वर होऊ शकतो उपचार)
केस आणि त्वचेसाठी फायदेशीर -
मोड आलेल्या धान्यातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे तुमची त्वचा नितळ आणि चमकदार होते. तसेच केस घनदाट आणि मजबूत होतात.
शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत -
मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
ह्रदयरोगांपासून सुटका -
अंकुरित धान्याचे सेवन केल्यामुळे ह्रदयरोगाची समस्या दूर होते. त्यामुळे रोजच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. अंकुरित धान्यामुळे तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे तुमची हृदयरोगांपासून सुटका होते.