Dental Horror | Representational Image (Photo Credits: Pixabay)

युनायटेड स्टेट्समधील मिनेसोटा (Minnesota) येथील कॅथलीन विल्सन (Kathleen Wilson) या महिलेने तिच्या दंतचिकित्सकाविरुद्ध (Dentist) कायदेशीर कारवाई करत खटला दाखल केला आहे. मोलड्रेम फॅमिली डेंटिस्ट्रीचे डॉ. केविन मोल्ड्रेम (Dr. Kevin Molldrem of Molldrem Family) यांच्याविरुद्ध हा दावा दाखल करण्यात आला आहे. महिलेने म्हटले आहे की, दंतवैद्याने म्हणजेच दातांच्या डॉक्टरने एकाच वेळी तिच्या 28 दातांवर तब्बल पाच तास 30 शस्त्रक्रिया केल्या आहेत. आल्याला दातांच्या डॉक्टर भयानक आणि तितकाच वेदनादायी अनुभव देऊन गेला असे या महिलेने म्हटले आहे.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार विल्सनचा दावा आहे की, डॉ. मोल्ड्रेम यांनी जुलै 2020 मध्ये एकाच भेटीत आठ दातांवर कवच (कॅप), चार रूट कॅनाल आणि 20 फिलिंग केले. ज्यामुळे तिची हालत अत्यंत वाईट झाली आणि तिला प्रचंड वेदनेचा सामना करावा लागला.

चुकीच्या पद्धतीने भूल दिल्याचा आरोप

विल्सनने दंतचिकित्सकावर आरोप करत म्हटले आहे की, सदर डॉक्टरने तिच्यावर निष्काळजीपणे भूल (अॅनेस्थेसियाचा) दिली. शिवाय अनेक वैद्यकीय त्रूटी लपवल्या. आपल्या आरोग्य आणि दातांच्या उपचाराबद्दल चुकीच्या नोंदी केल्या. या सर्व बाबींसाठी विल्सनने डॉक्टरकडे 50,000 डॉलरची नुकसानभरपाई मागितली आहे. विल्सन हिस पाठिमागील काही दिवसांपासून दातांच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. ज्याचे निराकरण करण्यासाठ ती डॉ. केविन मोल्ड्रेम यांच्याकडे गेली होती. (हेही वाचा, तुमचे पांढरेशुभ्र चमकदार दात या 5 कारणांमुळे होतात खराब)

डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप

दरम्यान, खटल्याचे कायदेशीर मुल्यांकन करण्यासाठी विल्सनच्या कायदेशीर टीमने नियुक्त केलेले फ्लोरिडा येथील डॉ. अव्रम गोल्डस्टीन यांनी डॉ. मोल्ड्रेम आणि इतर डॉक्टरांनी प्रदान केलेल्या वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी केली आहे. विल्सनच्या तोंडातील अक्षरशः प्रत्येक दात किडला होता. हे मान्य असले तरी डॉक्टरांनी त्याबाबत आवश्यक काळजी घेण्याची गरज होती. मात्र, त्यासंबंदीच्या कोणत्याच बाबींचे, नियमांचे पालन डॉक्टर आणि त्यांच्या पथकाकडून करण्यात आले नसल्याचे डॉ. गोल्डस्टीन यांनी म्हटले आहे. Tooth Decay: दात किडणे, झिजणे टाळण्यासाठी Water Fluoridation फायदेशीर- संशोधन

अव्यवहार्य आणि अमानवीय वर्तन केल्याचा आरोप

डॉ. गोल्डस्टीन यांनी विल्सनच्या दातांच्या समस्या आणि उपाचारांबाबत बोलताना डॉक्टरांनी विचारपूर्वक, सावकाश आणि वैद्यकीय परिमानांची पूर्तता करत प्रत्येक पाऊल जपून टाकणे आवश्यक होते. असे असताना त्यांनी विल्सन यांच्यासोबत अव्यवहार्य आणि अमानवीय असे वर्तन केले, असे म्हटले. पुणे बलताना एखाद्या व्यक्तीच्या 28 दातांवर एकाच वेळी तब्बल साडेपाच तास उपचार करणे त्यातही तब्बल 30 शस्त्रक्रीया करणे याची कल्पनाही भयावह आहे, असेही डॉ. गोल्डस्टीन म्हणाले.

या खटल्यात असाही आरोप करण्यात आला आहे की डॉ. मोल्ड्रेम विल्सन आणि त्यांची टीम विल्सन हिचा आजार आणि त्यावर उपचार करताना उद्भवारा संभाव्य धोका विचारात घेतला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी तिला गरजेपेक्षा अधिक काळ भूल (ऍनेस्थेसिया) दिली.