Close
Advertisement
 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024
ताज्या बातम्या
6 hours ago

तुमचे पांढरेशुभ्र चमकदार दात या 5 कारणांमुळे होतात खराब

स्वस्थ आणि सुंदर दात तुमचे सौंदर्य आणखीनच खुलवतात. त्यामुळे त्यांची योग्य ती निगा राखणे खूप गरजेचे आहे.

आरोग्य Poonam Poyrekar | Jul 10, 2019 03:51 PM IST
A+
A-
Teeth (Photo Credits: PixaBay)

तुमच्या व्यक्तिमत्त्वाची शोभा वाढवतात किंवा तुमचे व्यक्तिमत्त्व ज्याने खुलते ते म्हणजे तुमचे पांढरेशुभ्र दात. आपले दात मोत्यांसारखे पांढरेशुभ्र असावे असे कोणाला वाटत नाही. कारण स्वस्थ आणि सुंदर दात तुमचे सौंदर्य आणखीनच खुलवतात. त्यामुळे त्यांची योग्य ती निगा राखणे खूप गरजेचे आहे. कारण जर तुमचे दात खराब असले तर तुम्हाला अनेकदा अपमानही सहन करावा लागतो. तसेच दातांची योग्य ती काळजी न घेतल्यास तुम्हाला दातांसंबंधी अनेक आजारांचाही सामना करावा लागतो. त्यात दातांचे पिवळेपण, श्वासाची दुर्गंधी, हिरड्यांच्या समस्या, दातांमधील किड यांसारख्या समस्या उद्भवतात.

अशा भयंकर आजारांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही नियमितपणे दातांची योग्य ती काळजी घेतली तर तुमचे दात पांढरेशुभ्र आणि स्वस्थ राहतील. त्यासाठी अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही रोज केल्या पाहिजेत. चला तर पाहूया कोणत्या आहेत या 5 गोष्टी

1. दिवसातून दोनदा दात घासणे

दात सुरक्षित आणि निरोगी ठेवायचे असेल तर दिवसातून दोन वेळा दात घासणे जरुरीचे आहे. रोज दोनदा दात घासल्याने दातात किड होत नाही आणि दात चांगले राहतात. ब्रश करण्यासाठी नेहमी मऊ केस असलेले टूथब्रश वापरावे.

2. अधिक प्रमाणात साखर खाणे वर्ज्य करा

जर तुम्हाला जास्त साखर किंवा गोड पदार्थ खाण्याची सवय असेल तर तुमचे दात लवकर खराब होऊ शकतात. त्यासाठी आपल्या आहारात साखरयुक्त पदार्थांचे प्रमाण थोडक्यात साखरेचे प्रमाण कमी करणे.

3. शीतपेय (Cold Drink)न पिणे

जर तुम्हाला शीतपेय पिण्याची सवय असेल तर तुमच्या दातांवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. खरे पाहता कोल्ड्रिंग, फळांचा रस हे आम्ल पदार्थ असतात. ज्याने दातांच्या इनमेल मध्ये खनिज मिसळायला लागतात. ज्यामुळे ब-याचदा दातांमुळे छिद्र व्हायला लागतात आणि दात कमकुवत व्हायला लागतात.

4. फळांचे सेवन करावे

ताजी आणि रसयुक्त फळे शरीरासाठी गुणकारी असतात. दातांना स्वस्थ आणि हेल्दी बनविण्यासाठी फळे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. फळांमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आजारांचा धोका कमी होतो. फळे खाल्ल्याने दातांमध्ये किड लागण्याची शक्यता कमी होते.

5. भरपूर पाणी प्या

स्वस्थ राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे हे जितके गरजेचे आहे तितकेच स्वस्थ दातांसाठीही भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. भरपूर पाणी प्यायल्याने दात पांढरे आणि चमकदार होतात. यासाठी दिवसातून कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्यायले पाहिजे.

हेही वाचा- तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी करा हे 10 घरगुती उपाय

तुमचे दात स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत. तसेच दातांसंबधी काही समस्या उद्भवल्यास त्विरत डेंटिस्ट चा सल्ला घेतला पाहिजे. दर 6 महिन्यांनी डॉक्टरांकडे जाऊन दात तपासून घेतले पाहिजे.

सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)


Show Full Article Share Now