Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

युरोपमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) आणि अ‍ॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) च्या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. लवकरच या लसीचा रोलिंग रिव्ह्यू (Rolling Review) युरोपीयन मेडिकल एजन्सीद्वारे (European Medicines Agency) जारी करण्यात येईल. तज्ञांच्या मतानुसार, वैद्यकीय समितीकडून यास मंजूरी मिळाल्यानंतर काही दिवसांतच ही लस नागरिकांसाठी वापरण्यात येईल. दरम्यान, यासंबंधितची अधिकृत माहिती युरोपीयन मेडिकल एजन्सीकडून अद्याप देण्यात आलेली नाही. परंतु, Bloomberg ने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच या लसीच्या शेवटच्या टप्प्यातील परिणामांचे रिव्ह्यू करुन याचा अहवाल या आठवड्याभरात जारी करण्यात येईल.

युके मध्ये लस दिलेल्या दोन स्वयंसेवकांची प्रकृती बिघडल्याने या लसीच्या चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या, त्या दरम्यान प्रकृती बिघडलेल्या स्वयंसेवकांच्या आजरी पडण्याच्या कारणाचा शोध केला जात होता. याबद्दलचा अहवाल समोर आल्यानंतर युके मध्ये एका आठवड्यात ट्रायल्स पुन्हा सुरु करण्यात आल्या. (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कोविड-19 वरील लसीच्या ट्रायल्सच्या स्थगितीनंतरही या वर्षाअखेरपर्यंत लस तयार होण्याची शक्यता; अ‍ॅस्ट्राझेनेका सीईओ Pascal Soriot)

या लसीच्या चाचण्या भारत, साऊथ आफ्रीका आणि ब्राझील या देशांतही सुरु आहेत. परंतु, लस दिल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या दोन स्वयंसेवकांचा तपशील अहवाल पडताळल्याशिवाय अमेरिकेत या लसीच्या चाचण्या करण्यात येऊ नयेत, असा निर्णय अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थांनी घेतला होता. दरम्यान, भारतातील पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट या लसीच्या चाचण्या करत आहे. युके मधील चाचण्यांच्या स्थगितीनंतर भारतानेही चाचण्या थांबवल्या होत्या. मात्र युकेने चाचण्या सुरु केल्यानंतर भारतातही चाचण्या सुरु करण्यात आल्या.

Rolling Review म्हणजे काय?

नागरिकांसाठी लसीचा वापर सुरु करण्यापूर्वी लसीच्या ट्रायल्सच्या रिव्ह्यू एका समितीद्वारे घेण्यात येतो. या रिव्ह्यू प्रक्रीयेत लसीच्या क्लिनिकल टेस्टचा डेटा अगदी खोलवर तपासला जातो. इर्मजन्सीच्या काळात वेळ वाचण्यासाठी रोलिंग रिव्हयू सादर केला जातो. लसीच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरु असून येणाऱ्या परीणांमाद्वारे रोलिंग रिव्ह्यू तयार करण्यात येत आहे.

युरोपीयन मेडिकल एजन्सीचे लसीचे प्रमुख Marco Cavaleri यांनी सांगितले की, या लसीचा रोलिंग रिव्हयू युकेमधील उन्हाळा संपल्यानंतर देण्यात येईल. तसंच या लसीला 2020 अखेरपर्यंत मंजूरी मिळण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.