Coronavirus Pandemic पूर्वी जोडप्यांना Sex मधून अधिक समाधान मिळत होतं- Study
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : youtube)

मागील दोन वर्षांमध्ये कोरोना वायरस जागतिक महामारीने (Coronavirus Pandemic) सार्‍यांचंच आयुष्य बदलून गेले आहे. आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर त्याचा परिणाम झाला आहे. दरम्यान Sex Lives वर या महामारीचा कसा परिणाम झाला याबद्दलही चर्चा आहे. सुरूवातीला लॉकडाऊन, क्वारंटीन हे सारे काही आठवड्यांसाठीच असेल असे अनेकांना वाटत होते पण जसजसा काळ पुढे सरकला तशी परिस्थिती बदलत गेली आणि आता क्वारंटीनचा काळ अनिश्चित होऊन बसला आहे. सध्या अनेकजण आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या साथीदारासोबत, मुलांसोबत इतका वेळ एकत्र राहत असतील.

पूर्वी तुमच्या आयुष्यात घडणार्‍या घडामोडी तुमच्या लैंगिंक सुखावर परिणाम करू शकतात असं म्हटलं जात होते. तसे वैज्ञानिक अहवाल देखील समोर आले आहेत.

Prof Joachim Osur या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ एक्सपर्टच्या आणि Nairobi मधील AMREF International University चे डीन यांच्या AMREF study मध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, 73.4% विवाहित जोडपी ही जागतिक महामारीपूर्वी लैंगिक सुख अनुभवत होती पण आता पॅन्डेमिक मध्ये हेच प्रमाण 58.4% झाले आहे. हे धक्कादायक नाही कारण घरात मुलांचा वावर असल्याने सेक्सची इच्छा बाजूला पडली असू शकते.

प्रामुख्याने परिणाम हा सेक्समधून समाधान मिळत नसल्याचा आहे. 31-40 वयोगटातील पुरूष आणि लग्न होऊन 20 वर्षापेक्षा कमी काळ झालेल्यांमध्ये असामाधान अधिक आहे. अहवालाच्या लेखकांच्या मते या काळात सेक्सश्युअल अ‍ॅक्टिव्हिटी अधिक असते. सेक्सश्युअल प्रोसेस ज्यामध्ये फोरप्ले, सेक्श्युअल पॉझिशन आणि सेक्सचा वेग हा या असमाधानतेचा कॉन्ट्रिब्युटर असू शकतो. हे देखील नक्की वाचा: 30शी मधील तरूणाने COVID मुळे Penis चा आकार दीड इंचाने कमी झाल्याचा केला दावा .

orgasm किंवा libido मध्ये घसरण होण्यामध्ये महत्त्वाचं एक कारण म्हणजे कोविड 19 मुळे जगात सर्वत्रच पसरलेली अनिश्चितता आणि ताण. दरम्यान जी जोडपी एकत्र होती त्यांच्यामध्येही 'सेक्स' बाबत इच्छा कमी होती.

कोरोना जागतिक महामारीमध्ये अजून एक गोष्ट जी समोर आली ती म्हणजे सेक्स टॉयची झालेली विक्री. याचं प्रमाण या काळात अधिक होतं. त्याच्यामाध्यमातूनही अनेकांनी सेक्सचा आनंद घेतला.

मार्च 2020 पासून ऑनलाईन डेटिंग मध्येही वाढ झाली आहे. टिंडर वर दिवसाला 3 बिलियन स्वाईप्स झाल्याचं समोर आलं आहे. हा आतापर्यंतचा सर्वोच्च नंबर आहे. व्हर्च्युअल डेटिंगमध्येही वाढ झाली आहे. लोकांना प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी त्यांना जाणून घेण्याकडे अनेकांचा कल आहे. पॅन्डेमिकमध्ये अद्याप लोकांना' प्रेमा'चा विसर पडलेला नाही.