30शी मधील तरूणाने COVID मुळे Penis चा आकार दीड इंचाने कमी झाल्याचा केला दावा
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Slate मासिकाच्या ताज्या अंकामध्ये "How to Do It | Sex Advice with Stoya and Rick," मध्ये एका तिशीतील तरूणाने त्याला करोना झाल्यानंतर त्याला Penile Shrinking या लॉंग टाईम साईड इफेक्टला सामोरं जावं लागत असल्याचं दावा त्याने केला आहे.

कोरोनाच्या आजारपणापूर्वी त्याच्या शिश्नाचा (Penis)चा आकार "Above Average" होता, मात्र जुलै 2021 मध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्याच्या लक्षात आलं त्याच्या शिश्नाचा आकार दीड इंचाने कमी झाला होता. या तरूणाने त्याचे वॅक्सिन स्टेटस शेअर केलेले नाही पण हा त्रास कायम राहणार असल्याचं त्याला वाटत आहे. 'डॉक्टरांच्या मते हे Vascular Damage मुळे झालं असावं आणि ही स्थिती कायमस्वरूपी राहील असा अंदाज असल्याचं' त्याने सांगितलं आहे.

Urologists च्या मते, अनेकांना कोविड 19 ची लागण झाल्यानंतर Erections वर परिणाम झाल्याचं आढळून आलं आहे. कोविड 19 मुळे शिश्नाला होणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि काही रूग्णांमध्ये erectile dysfunction चा त्रास जाणवतो. कोविड 19 शिश्नावर परिणाम करत असल्याचे पुरावे आहेत. हे देखील नक्की वाचा: Pollution Effect On Human Private Part: प्रदूषणामुळे लहान होत आहे मानवी लिंगाचा आकार; अहवालातून धक्कादायक खुलासा .

ऑगस्ट 2021 मध्ये एका लहान जारी अभ्यासामध्ये नमूद केल्यानुसार काहींना कोविड 19 संसर्गानंतर Erectile Dysfunction चा त्रास जाणवत आहे. त्यांच्यामध्ये शिश्नात व्हायरच्या पार्टिकल्सचा समावेश झाला असल्याचं सांगितले जाते. अभ्यासकांच्या मते, इंफेक्शन शिश्नाला होणार्‍या रक्तपुरवठ्यामध्ये बाधा निर्माण करत आहे.

Insider च्या पूर्वी प्रसिद्ध वृत्तामध्ये कोविड 19 संसर्ग त्यांच्यामध्ये आहे ज्यांना ब्लड कॉट्सचा त्रास, पुरेसा रक्तप्रवाह नाही त्यांना कोविड टोज, स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअरचा त्रास आहे. Urologists च्या मते, Penis Pumps आणि Stretching Devices यांच्या मदतीने कोविड संबंधित Erectile Dysfunction च्या समस्येमधून बाहेर पडण्यास थोडी मदत होऊ शकते.