Coronavirus And Sex: संभोग केल्याने कोरोना व्हायरस होतो का? अनेकांना पडलाय प्रश्न, उत्तर काय?
Coronavirus And Sex | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus and sex: कोरोना व्हायरस संक्रमनाबाबत जगभरात अनेक तर्क वितर्क आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसबाबत अनेक समज गैरसमज निर्माण झाले आहेत. ज्याबाबत नागरिकांना उत्सुकता आणि प्रश्न आहेत. संभोग केल्यामुळे म्हणजेच सेक्स केल्यामुळे कोरोना व्हायरस होतो का किंवा पसरतो का? हा सुद्धा असाच एक प्रश्न. अनेकांना हा प्रश्न सतावतो आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) तर म्हणते COVID-19 हा एक Pandemic म्हणजेच साथीचा आजार आहे. COVID-19 हे कोरोना व्हायरसचे वैद्यकीय नाव आहे.

आगोदर लक्षणे जाणून घ्या

संभोग केल्याने कोरोना व्हायरस होतो का किंवा पसरतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी कोरोना व्हायरसची लक्षणे काय हे जाणून घ्यायला हवे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्याप्रमाणे ताप, सर्दी, खोकला, श्वासनास त्रास, नाकातून पाणी गळणे, घसा खवखवणे, आवाजात बदल, अशक्तपणा, अशी या आजाराची लक्षणे आहेत. डब्ल्यूएचओ (WHO) सांगते की, अशी लक्षणे एकाच वेळी आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच, स्वत:हून विलगिकरण कक्षात राहा. पुढील निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.

सेक्स केल्याने खरोखरच पसरतो कोरोना व्हायरस?

सेक्स केल्याने कोरोना व्हायरस खरोखरच पसरतो का? या प्रश्नाचे थेट उत्तर 'होय' किंवा 'नाही' यामध्ये देता येत नाही. पुढे आलेली माहिती आणि प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त विचारात घेता आजवर तरी सेक्स केल्याने कोरोना व्हायरस झाल्याची किंवा पसरल्याची अधिकृत माहिती पुढे आली नाही. पण, एक गोष्ट मात्र खरी की, जर कोरोना व्हायरस झालेल्या व्यक्तिच्या संपर्कात एखादा व्यक्ती आला. किंवा त्या व्यक्तिसोबत एखाद्या व्यक्तीने संभोग (सेक्स) केला तर मात्र त्याला COVID-19 बाधा होऊ शकते. त्यामुळे कोरना लक्षणे दिसणाऱ्या अथवा कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीशी संभोग करणे टाळले. तर कोरोना व्हायरस होण्याची शक्यता बरीच कमी आहे. (हेही वाचा, Coronavirus: 'या' रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त धोका; वाचा काय सांगतेय सर्वेक्षण)

कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि जगभरातील देश प्रयत्नशिल आहेत. त्यासाठीच डब्ल्यूएचओने कोरोना व्हायरसबाबत एक मार्गदर्शक सूची जारी केली आहे. जी जगभरातील देशांना लागू आहे. प्रति 20 मिनीटांनी हात साबणाने स्वच्छ धुणे. व्यक्तीगत आणि सामाजिक स्वच्छतेची, आरोग्याची काळजी घेणे यांसारख्या सूचना डब्ल्यूएचओने केल्या आहेत.