Vaccine | Representational Image | (Photo Credits: ANI)

दरवर्षी भारतात जवळपास आठ लाखांपेक्षा अधिक कर्करोगाचे (Cancer) रुग्ण आढळून येतात. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढताना दिसत आहे.  कर्करोगाच्या या रुग्णांमध्ये 50 टक्के पुरुष तर 17 टक्के स्त्रीया अशी कर्करोगी ग्रस्तांचा  देशात आकडेवारी आहे. कर्करोग म्हणजेच कॅन्सरवर आजवर कुठलही रामबाण असं औषध न सापडल्याने कॅन्सरमुळे होणारा मृत्यूदर अधिक आहे. देशात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने  मृत्यू होतो. भारतात, हा महिलांमध्ये दुसरा सर्वात घातक आजार आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर HPV ही लस उपलब्ध आहे. या लसीला जगभऱ्यातील 28 देशांनी मान्यता दिली आहे. तरी आता HPV या लसीला DGCA कडून भारतात उत्पादनाची मान्यता देण्यात आली आहे.

 

DGCA  च्या मान्यतेनंतर आता भारतातील पहिल्या क्वाड्रिवेलेंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस वॅक्सिन (HPV) चे उत्पादन भारतात सुरू होणार आहे आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) HPV या लसीचं उत्पादन करणार आहे.  ही लस लवकरच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ अदर पूनावाला (CEO Adar Poonawala) यांनी ट्विट (Tweet) करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी प्रथमच भारतात HPV ही लस बनवली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट कडून उत्पादित केली जाणारी ही लस सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत भारतीय बाजारात उपलब्ध असेल तसेच या वर्षाच्या शेवटी म्हणजेच 2022 च्या शेवटी ही भारतात उपलब्ध होणार आहे असेही ते म्हणाले. संबंधीत लसीबाबत परवानगी दिल्याने आदर पुनावाला यांनी DCGI चे आभार मानले. (हे ही वाचा :- Guru Purnima 2022 Messages in Marathi: गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने खास मराठी Images, WhatsApp Status, Wishes पाठवून करा तुमच्या जीवनातील गुरूला वंदन)

 

HPV चं भारतात होणार उत्पादन ही भारतीय महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण इतर कुठल्या कर्करोगापेक्षा महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. आदर पुनावाला यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीही सिरम इंस्टीट्यूट कडून कोव्हिड (Covid) लस कोव्हिशील्ड (Covishield) या लसीचं उत्पादन करण्यात आलं होत. कोव्हिशील्ड ही लस भारतीय लसीकरणात सर्वाधिक वापरल्या गेलेल्या लसींपैकी एक आहे. तरी  सिरम इंस्टीट्यूट करुन करण्यात येणाऱ्या HPV या लशीची प्रतिक्षा संपूर्ण भारतीयांना आहे.