सनातन धर्मात आषाढ महिन्यातील पौर्णिमा ‘गुरु पौर्णिमा’ (Guru Purnima 2022) म्हणून साजरी केली जाते. शिवपुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूचे अवतार वेद व्यासजी यांचा जन्म झाला होता. महर्षी वेद व्यासजी यांना प्रथम गुरु ही पदवी दिली जाते, कारण गुरु व्यासांनी मानवजातीला प्रथमच चार वेदांचे ज्ञान दिले होते. या तिथीला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. यंदा 13 जुलै 2022, बुधवारी गुरुपौर्णिमेचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. गुरु पौर्णिमेला, जगतगुरु वेद व्यास यांच्यासह लोक आपल्या गुरूंची सेवा आणि पूजा करतात.
सृष्टीच्या सुरुवातीपासूनच, शैक्षणिक ज्ञान, अध्यात्म आणि साधनेचा विस्तार करणे आणि ते प्रत्येक मानवासाठी सुलभ व्हावे या उद्देशाने गुरु-शिष्य परंपरेचा जन्म झाला. जो शिष्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो त्याला गुरु म्हणतात. भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान देवाच्याही वरचे आहे. या दिवशी केवळ गुरूच नव्हे तर कुटुंबातील सर्व ज्येष्ठ सदस्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि त्यांना गुरू मानून त्यांचा आदर केला पाहिजे. गुरुंच्या सन्मानार्थ हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो.
तर अशा या गुरुपौर्णिमेनिमित्त खास मराठी Wishes, Messages, HD Images, Wallpapers, Greetings पाठवून तुमच्या जीवनातील गुरूला करा वंदन-
दरम्यान, विशेषत: पावसाळ्यात गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागेही एक कारण आहे. कारण या चार महिन्यांत ना खूप उष्णता असते ना खूप थंडी. हा काळ अभ्यास आणि अध्यापनासाठी अनुकूल आणि उत्तम आहे. म्हणून शिष्य गुरूंच्या चरणी राहून ज्ञान, शांती, भक्ती आणि योगशक्ती प्राप्त करण्यासाठी हा काळ निवडतात. या पौर्णिमेला वर्षातील इतर सर्व पौर्णिमांमध्ये सर्वाधिक महत्त्व आहे. या पौर्णिमेला केलेल्या पूजेमुळे वर्षभरातील सर्व पौर्णिमेचे फळ प्राप्त होते.