बॉलिवूडमधील कलाकारांचा फीटनेस मंत्रा जाणून घ्या, 'या' कलाकारांनी घटवले तब्बल 50 किलो वजन
बॉलिवूड कलाकार (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

बॉलिवूडमधील कलाकार हे नेहमीच त्यांच्या फीटनेसबाबत सतर्क असतात. तसेच चित्रपटात सुंदर दिसण्यासाठी आणि सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात. तर तुम्हाला माहिती आहे का या कलाकारांनी तब्बल 50 किलो वजन घटवले आहे. त्यामागील तुम्हाला त्यांचा फीटनेस मंत्रा माहिती आहे का?

1.सारा अली खान

बॉलिवूडमध्ये स्टारकीड म्हणून नुकतेच पदार्पण केलेली अभिनेत्री सारा अली खान ही सध्या चर्चेत आहे. परंतु साराला पीसीओएस हा आजार असल्याने तिचे वजन 96 किलोवर जाऊन पोहचले होते. तर पिझ्झा हा तिच्या खाण्याच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. परंतु दिवसेंदिवस वजन वाढत चालल्याने साराने खाण्यापिण्यात बदल केला. त्यानंतर दररोजच्या व्यायामाला सुरुवात करुन साराने सध्या 30 किलोपेक्षा जास्त वजन कमी केले आहे.

2. भूमी पेडणेकर

दम लगाके हैशा या बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच पदार्पण करणारी भूमी पेडणेकर हिचे वजन 72 किलो होते. परंतु या चित्रपटासाठी तिने आणखी वजन वाढविले होते. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर योग्य डायट आणि व्यायामाच्या जोरावर भूमीने स्वत:ला सुपरफीट बनविले. त्याचसोबत काही महिन्यातच भूमिने 27 किलो वजन कमी केले आहे.

3. सोनाक्षी सिन्हा

शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हाचे वजन 90 किलोवर जाऊन पोहचले होते. परंतु दबंग चित्रपटात सलमान खान सोबत झळकण्यासाठी सोनाक्षीने वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यानंतर फीटनेस फंडा वापरुन तिने 30 किलो पर्यंतचे वजन कमी केले आहे.

4. अर्जून कपूर

बॉलिवूडमध्ये सध्या मलायइका सोबत प्रेमसंबंधात असणाऱ्या अर्जून कपूरचे एके काळी वजन 130 किलो होते. परंतु 'इश्कजादे' या चित्रपटातून झळकण्यासाठी त्याने तब्बल 50 किलो वजन कमी केले.

5.अदनान सामी

प्रख्यात गायक अदनान सामी यांचे फीटनेसच्या बाबतीत कौतुक केले जात आहे. तब्बल 130 किलो वजन असणाऱ्या अदनान सामी यांनी व्यायामाचा मंत्राचे पालन करुन 11 महिन्यात 130 किलो वजन घटवले आहे. तर 2007 मध्ये अदनान सामी यांचे वजन जवळजवळ 206 किलो एवढे होते.