भूमी पेडणेकर आणि सुशांत सिंग राजपूत (Photo Credit: RSVP Films)

Sonchiriya Teaser : सध्या टिपिकल कमर्शिअल गल्लाभरू चित्रपटांपेक्षा आशयघन चित्रपटांची चलती आहे. प्रेक्षकही नवीन विषय, हाताळण्याच्या नवीन पद्धती स्वीकारत आहेत. म्हणूनच ‘बधाई हो’ सारखा लो बजेट चित्रपट 300 करोडपेक्षा व्यवसाय करू शकला. या बदलामुळेच राजकुमार राव, विकी कौशल, आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांसारख्या काही ताकदीच्या अभिनेत्यांची कारकीर्द बहरत आहे. यात आता अजून एका नावाची भर पडली आहे ते म्हणजे सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput). पवित्र रिश्ता मालिकेतून पदार्पण केलेल्या सुशांतने अल्पावधीतच स्वतःला सिध्द केले. आज त्याचा केदारनाथ चित्रपट प्रदर्शित झाला असून, याच मुहूर्तावर आगामी चित्रपट सोनचिड़िया (Sonchiriya) चा टीजर  प्रदर्शित करण्यात आला आहे.

चंबळच्या खोऱ्यातील डाकूंची कहाणी या सोनचिड़िया चित्रपटात दिसणार आहे. मान सिंगची गँग कशाप्रकारे आजूबाजूच्या प्रदेशावर कब्जा करण्याचा प्रयत्न करते याचे दर्शन या चित्रपटात घडेल. याचसोबत या चित्रपटात अजून एका गोष्टीचा उल्लेख आहे ती म्हणजे सोनचिड़िया, म्हणजे गोल्डन बर्ड. सर्वजन गोल्डन बर्ड शोधण्याचा प्रयत्न करत असतात मात्र तो कोणाच्या हाती येतो हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. या चित्रपटात सुशांत एका दरोडेखोराची भूमिका सकारत आहे. 'बैरी बेईमान, बागी सावधान' अशी या चित्रपटाची टॅग लाईन आहे.

या चित्रपटात सुशांतसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar), मनोज वाजपेयी, रणवीर शौरी, आशुतोष राणा हे कलाकार दिसणार आहेत. अभिषेक चौबे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट नव्या वर्षात फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होईल.