Cancer Vanishes: कर्करोग बरा होतो, इतिहासात प्रथमच औषध चाचणीला यश? वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
Medical | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

कर्करोग (Cancer) या दूर्धर आजाराने अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. जगभरात अनेक लोक या आजाराने असहाय्य वेदना आणि जीवन जगत आहे. दरम्यान, या नागरिकांची कर्करोगाच्या मगरमिठीतून सुटका होण्याची शक्यता आहे. संशोधकांना कर्करोगावर औषध (Cancer Vanishes) सापडल्याचा दावा केला जात आहे. न्यूयॉर्क टाईम्स या दौनिकाच्या हवाल्याने जगभरातील प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे. या वृत्तात कॅन्सर असलेल्या रुग्णांच्या एका छोट्या गटावर केलेल्या उपचारांना संशोधकांना यश आल्याचे म्हटले आहे. संशोधकांनी केलेल्या प्रयोगात रेक्टल कॅन्सर असलेल्या अमेरिकेमधील काही रुग्णांचा कर्करोग प्रायोगिक उपचारांनी नाहीसा झाल्याचे पाहायला मिळाले.

न्यू यॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 18 रुग्णांच्या एका गटावर संशोधकांनी संशोधन केले. त्याला आश्चर्यकारक प्रतिसाद मिळताना दिसून आला. या गटातील रुग्णांनी डॉस्टारलिमॅब (Dostarlimab) नावाचे औषध सुमारे सहा महिने घेतले. हा प्रयोग अगदी लहान क्लिनिकमध्ये करण्यात आला. या क्लिनिकमध्ये रुग्णांवर सहा महिन्यांपासून अधिक काळ उपचार आणि संशोधन सुरु होते. औषध घेतल्यावर या रुग्णांचा ट्यूमर गायब झाल्याचे आढळून आले. (हेही वाचा, Male Breast Cancer: 70 वर्षीय पुरुषास स्तनांचा कर्करोग, दुर्मिळ प्रकरण )

दरम्यान, डॉस्टारलिमॅब (Dostarlimab) नावाच्या औषधाचा कर्करोगावर परिणाम जाणवून आल्याच्या दावा केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हे औषध सर्व प्रकारच्या कर्करोगावर परिणामकारक ठरु शकते का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली असून त्या दृष्टीने संशोधानस सुरुवातही झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात मोठ्याप्रमाणात चाचण्या, संशोधन आणि अभ्यास आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

उल्लेखनीय म्हणजे वैद्यकीय इतिहासात प्रथमच डॉस्टारलिमॅब हे औषधाची निर्मिीत प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या रेणूंपासून करण्यात आली आहे. दवा करण्यात आला आहे की हे औषध शरीरात पर्यायी प्रतिपिंडासारखे काम करते. ज्या रुग्णांवर या औषधाचा वारप केला त्या रुग्णांचा कर्करोग पूर्णपणे बरा झाला. वैद्यकीय तपासणीत त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा ट्यूमर आढळला नाही.