कोरोना विषाणूचे वाढते प्रादुर्भाव पाहता लोकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच कोरोना हा हवेतून प्रसारीत होणारा विषाणू आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संस्थेने दिली होती. कोरोना विषाणूपासून बचावाकरण्यासाठी सोशल डिस्टिंग हे एकमेव रामबाण आहे. यामुळे पादाच्या हवेतून कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ शकते का? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत. या प्रश्नाला बिजिंग (Beijing) येथील नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (CDC) अहवालाने पूर्णविराम लावला आहे. बिजिंग येथील रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या कोरोबाधीत रुग्णांने वायुगॅस सोडला तर, त्याच्या शेजारी असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातला आहे. कोरोना विषाणू हा हवेमार्फत पसरत असल्यामुळे प्रत्येकजण एकमेकांना संशयाच्या नजरेने पाहू लागला आहे. यातच बिजिंग रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या अहवालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता पादाच्या हवेतून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना झालेल्या व्यक्तीने सोडलेल्या वायुगॅसमुळे आजूबाजुच्या लोकांना कोरोना होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. परंतु, कोरोना बाधीत रुग्णांने पॅंट घातली असताना त्याच्या वायुगॅसमार्फत कोरोनाचा प्रसार होत नाही. कारण, त्यावेळी पॅंट ही कोरोना प्रतिबंधक मास्क सारखी भुमिका बजावते. मात्र, कोरोनाबाधीत उघडा असेल आणि त्यावेळी त्याने वायुगॅस सोडला तर, अनेकांनाही कोरोनाची लागण होऊ शकते असेही सांगण्यात आले आहे. यामुळे आता नागरिकांना अधिक सावध राहण्याचे संकेत मिळाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: फक्त एक फोन करा! COVID-19 बाबतची शंका घरबसल्या दूर करा
कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकून आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, मोठ्या संख्येत नागरिक कोरोना बाधित झाले आहेत. यामुळे अनेक लोकांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे.