Breast Milk Beauty Products (संग्रहित संपादित प्रतिमा)

आईच्या दुधात (Breast Milk) भरपूर पोषक असतात, म्हणूनच डॉक्टर नवजात बालकांना 6 महिने फक्त आईचे दूध पाजण्यास सांगतात. पण एका आईने आपल्या स्वतःच्या दुधापासून स्कीन केअर उत्पादने बनवली आहेत. या महिलेने ब्रेस्ट मिल्कपासून साबण, लोशन आणि डायपर क्रीम बनवले आहेत. हा साबण चेहऱ्यावर लावल्याबरोबर सुरकुत्या निघून जातात, चेहऱ्याला चमक येते, चेहरा तरुण दिसतो असा दावा तिने केला आहे. कोरड्या त्वचेवर हा साबण खूप फायदेशीर असून, दुखापत झाल्यानंतर हा साबण लावल्यास ते एक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते असे ती म्हणते.

आता या महिलेने अशा उत्पादनांचा मोठा व्यवसाय उभारला आणि सोशल मीडियावर ती इतर महिलांना प्रशिक्षण देत आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, या महिलेचे नाव ब्रिटनी एडी (Britni Eddy) असे असून ती 24 वर्षांची आहे. ब्रिटनी अमेरिकेमध्ये राहते.

ब्रिटनीला सात महिन्यांपूर्वी एक मूल झाले. सुरुवातीच्या काळात मूल संपूर्ण ब्रेस्ट मिल्क प्यायचे, पण नंतर दुधाची बचत होऊ लागली. ब्रिटनीने ते फ्रीजमध्ये ठेवण्यास सुरुवात केली. एके दिवशी तिचा नवरा फ्रीज चालू करायला विसरला आणि सर्व दूध खराब झाले. अशा दुधाचे काय करावे हे ब्रिटनीला कळेना. त्यानंतर तिने इंटरनेटवर शोध घेतला सात तिला एका महिलेची पोस्ट दिसली, जिथे जिने तिच्या स्वतःच्या दुधापासून साबण बनवला होता. त्यानंतर ब्रिटनीला अशा प्रकारची उत्पादने बनवण्याची कल्पना सुचली.

ईस्ट आयडाहो न्यूजशी बोलताना ब्रिटनी म्हणाली, बाळाला पाजल्यानंतर उरलेले दूध मी साबण बनवण्यासाठी वापरायला सुरुवात केली. हेल्थलाइनच्या मते, आईच्या दुधात त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी अनेक घटक असतात. त्यात लॉरिक ऍसिड देखील असते, ज्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो आणि त्वचेला थंड ठेवण्यास मदत करतो. ब्रिटनीने असा दावा केला की, आईच्या दुधापासून बनवलेला साबण चेहऱ्यावर लावल्यानंतर  सुरकुत्या निघून जातात, त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स निघून जातात आणि कोरडी त्वचा देखील सुधारू लागते. कालांतराने त्वचा गोरी होते आणि दीर्घकाळ सुरक्षित राहते. (हेही वाचा: Antacid Esomeprazole Alert: समोर आले अँटासिड एसोमेप्राझोलचे धोकादायक दुष्परिणाम; फार्मा बॉडीने डॉक्टर, रुग्णांसाठी जारी केला अलर्ट)

आता ब्रिटनीनेही इतर महिलांच्या मदतीने मोठा व्यवसाय उभा केला आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही तिच्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. या साबणाच्या सहा बारची किंमत $30 आहे. तर डायपर क्रीम आणि लोशनची किंमत 15 डॉलर आहे. हा साबण अनेक वेगवेगळ्या आकारात खरेदी करता येतो. मात्र, शास्त्रज्ञांनी याबाबत इशारा दिला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की आईच्या दुधात नक्कीच विविध प्रकारचे पोषक असतात मात्र साबण बनवण्याच्या प्रक्रियेत या पोषक तत्वांचा नाश होतो. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी एका चिनी महिलेचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती तिच्या दुधापासून साबण बनवून विकत होती. मात्र, नंतर सरकारने त्यावर बंदी घातली.