प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

बदाम (Almond)  रोज खाणे शरिरासाठी फायदेशीर असते. तसेच बदाम हे त्याच्यावरील सालीसकट खाल्ल्यास सर्व पोषण तत्वे शरिरासाठी उपयुक्त ठरतात. परंतु काही जण बदाम हे सालीसकट खाऊ नये असे म्हणतात. परंतु तुम्हाला बदाम खाण्याची योग्य पद्धत माहिती आहे का?

- पोषक तत्वे खूप आढळतात

बदाम हे सुकामेवाचा एक प्रकार आहे. तसेच दररोज बदाम खाल्ल्याने शरिराला फार मोठा फायदा होतो. यामध्ये प्रोटीन, फायबर, विटामिन ई, कॅल्शिअम आणि झिंक अशी विविध पोषक तत्वे बदाममध्ये आढळून येतात.

- बदाम सालीसकट खाल्ल्याने 'हा' परिणाम होतो

बदाम मध्ये टॅनिन नावाचे एंजायम असते. जे बदामामधील पोषक तत्वे शोषून घेण्यास अडथळा निर्माण करते. त्यामुळे नेहमी बदाम साल काढून खाणे उत्तम ठरते.

- बदाम भिजवून खा

बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी त्याचे सेवन करावे. बदाम पाण्यात भिजवल्याने नरम झाल्याने खाण्यास त्रास होत नाही. तसेच योग्यरितीने बदाम चावून खाल्ल्यास तो पचवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.त्याचसोबत बदाम भिजवल्याने त्यावरील साल काढून टाकण्याचा हा सोपा उपाय आहे.

-बदाम खाण्याचे फायदे

रोज सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्यास आरोग्यासाठी फायदेशीर असते. भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरिरातील चर्बी कमी होण्यास मदत होते. तसेच वारंवार भूक लागण्यापासून थोडा आराम मिळतो.

त्यामुळे जर तुम्ही आजवर बदाम सालीसकट खात असलास तर वेळीच सावध व्हा. त्याचसोबत बदाम खाण्यासाठी योग्य पद्धतीची सवय लावून घ्या.