Cancer Cell | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

मध्य प्रदेशच्या इंदौर मध्ये 22 वर्षीय रक्ताच्या कॅन्सरशी झगडत असलेल्या मुलीने जुळ्यांना जन्म दिला आहे. एका सरकारी हॉस्पिटल मध्ये या महिलेने बाळांना जन्म दिला आहे. ही एक दुर्मिळ घटना आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला Chronic Myeloid Leukaemia सोबत झगडत होती. हा रक्ताचा एक जीवघेणा कॅन्सर आहे. अशा महिलेची सुरक्षित प्रसुती करणं हे एक आव्हान आहे.

Government Super Specialty Hospital च्या Clinical Haematology Department ने Akshay Lahoti कडून दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यानंतर WBC ची संख्या प्रमाणापेक्षा अधिक होती. गरोदरपणाच्या काळामध्ये महिलेला केमोथेरपी आणि सामान्य कॅन्सरची औषधं दिली नाही.

"महिलेच्या उपचारांसाठी भारत आणि परदेशातून काही एक्सपर्टचा सल्ला घेतला होता. तिला विशेष औषधं देण्यात आली. या औषधांचा परिणाम तिच्या गर्भात वाढत असलेल्या बाळांवर होत नव्हता. " असे ते म्हणाले. Dr Sumitra Yadav यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला रक्ताचा कॅन्सर असल्याची माहिती दिली नव्हती. मात्र गरोदरपणाच्या काळात तिचं मानसिक आरोग्य बिघडू नये म्हणून काळजी घेतली. या महिलेने एका मुलाला आणि मुलीला जन्म दिला आहे. तिची नॉर्मल प्रसुती झाली आहे. आई आणि दोन्ही मुलांची स्थिती स्थिर आहे.

Dr Sumitra Yadav यांनी अशा प्रकारे डिलेव्हरी झालेली ही पहिलीच वेळ आहे. या बाळांच्या रूपाने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.