लहान मुलींमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या Barbie चं आता एक रूप Down's syndrome मध्ये देखील पाहता येणार आहे. बार्बी ची रेंज अधिक व्यापक करण्यासाठी हे नवं रूप बाजारात आणलं आहे. ही नवी डॉल Mattel Barbie Fashionistas line चा पार्ट असणार आहे. ज्याचा उद्देश सौंदर्याकडे पाहण्याची दृष्टी बदलण्यासोबतच या शारिरीक व्यंगाकडे कलंक म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन देखील बदलला जाणार आहे.
नव्या बार्बी डॉल बनवताना कंपनीने National Down Syndrome Society च्या मदतीने तिचा आकार, फीचर, कपडे आणि पॅकेजिंग केल्याचं सांगितलं आहे. यामुळे ती अधिक प्रकर्षाने Down syndrome व्यक्तीचं प्रतिनिधित्व करू शकणार आहे. नक्की वाचा: Barbie’s 60th Birthday च्या निमित्ताने जगातील प्रेऱणादायी 19 महिलांच्या स्वरूपात 'बार्बी डॉल', भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिचा समावेश .
डाऊन सिंड्रोम मध्ये काही जेनेटिक कंडिशन्स मुळे चेहर्याची ठेवण इतरांच्या तुलनेत वेगळी असते. शिकण्यामध्ये त्यांना अनेक अडथळे येऊ शकतात. Kandi Pickard,NDSS president and CEO यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ' ही नवी बार्बी रिमाईंडर देईल की आपण power of representation ला कधीही कमी लेखू नये. समाजातील सार्या घटकांना आपण एकत्र घेऊन जाणार आहोत यासाठीचं हे पहिलं आणि मोठं पाऊल आहे.
Barbie with Down syndrome makes her debut
Read @ANI Story | https://t.co/udOUZTg5QU#Barbie #DownSyndrome #BarbieDoll pic.twitter.com/dXROV1GQnH
— ANI Digital (@ani_digital) April 25, 2023
Down syndrome community चं प्रतिनिधित्त्व करणारी काही चिन्हं आणि पॅटर्न या डॉलच्या ड्रेस वर दिसणार आहेत. काही डाऊन सिंड्रोम असणार्या व्यक्ती
orthotic sneakers वापरतात त्याचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
नेटिझन्स कडून बार्बी डॉलच्या या रूपाला स्वीकारत अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिले आहेत. 1959 साली जेव्हा ही डॉल बाजारात आली तेव्हा ती स्लीम, गोरीपान आणि हाय हिल्स मध्ये होती. पण 2016 मध्ये, बाहुलीची विक्री कमी होत असताना, Mattel ने नवीन बाहुल्यांना अधिक समावेशक आणि त्यांच्या स्वरुपात वैविध्यपूर्ण बनवून बार्बीला अधिक वास्तववादी बनवले.
बार्बीला 22 डोळ्यांचे रंग आणि 24 हेअरस्टाइलसह चार शरीर प्रकार आणि सात त्वचेच्या टोनमध्ये पुन्हा सादर करण्यात आले.