90 च्या दशकातील अनेक मुलीचं बालपण बार्बी डॉल(Barbie Doll) सोबत गेलंय. यंदा 9 मार्च 2019 दिवशी हीच बार्बी तब्बल 60 वर्षांची झाली आहे. मागील साठ वर्षात जगभरात बार्बीचे रूप अनेकदा बदललं. काळानुसार तिच्या रुपात, रंगात बदल करण्यात आले. लहान मुलांच्या खेळण्यांमधील आणि विशेषतः डॉलमध्ये जगभरात इतकी प्रसिद्धी मिळवणारी बार्बी डॉल आजही लोकप्रिय आहे. रूपवान आणि परफेक्ट शेप म्हणून बार्बी डॉलकडे पाहिलं जात असे. त्यामुळे तिच्यावर टीकादेखील झाली. यंदा आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या (IWD2019) दुसऱ्या दिवशी या डॉलने 60 वर्षांचा टप्पा पूर्ण केल्याने जगभरातील 19 प्रेऱणादायी स्त्रियांना बार्बी डॉलच्या स्वरूपात साकारण्यात आलं. त्यामध्ये एक मान भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरला (Dipa Karmakar) मिळाला आहे.
दीपा कर्माकरने जिम्नॅशियममध्ये भारताचं नाव जागतिक स्तरावर नेलं. 2014 Commonwealth Games मध्ये दीपाने दमदार कामगिरी केली होती. भारताला तिने कांस्य पदक मिळवून दिले होते.
Barbie has always shown girls that they can be anything!! On the occasion of her 60th anniversary, I am honoured to be selected as a Barbie Role Model to help inspire the next generation of girls!#Barbie60 #YouCanBeAnything pic.twitter.com/6cnAWtLvDs
— Dipa Karmakar (@DipaKarmakar) March 9, 2019
दीपा सोबतच अमेरिका, न्यूझीलंड, जर्मन, फ्रान्स येथील विविध क्षेत्रातील नामवंत स्त्रियांचा प्रेऱणादायी महिलांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या महिलांचे कार्य पुढील पिढीला प्रेऱणादायी ठरेल या उद्देशाने त्यांच्या स्वरूपात बार्बी डॉल साकारण्यात आली आहे.