COVID 19 चा धोका किराणामाल खरेदी, खाण्यासाठी बाहेर पडणं यापेक्षा Air travel मध्ये कमी; Harvard च्या संशोधकांचा दावा
Airlines | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

कोरोना वायरसचा संसर्ग (Coronavirus Infection) होण्याची शक्यता किराणा माल खरेदीसाठी बाहेर पडणं किंवा खाण्यासाठी बाहेर पडणं याच्या तुलनेत विमन प्रवासात कमी असल्याचा दावा एका अभ्यासामध्ये करण्यात आला आहे. दरम्यान Harvard T H Chan School of Public Health केलेल्या संशोधनामधून ही महिती लोकांसमोर मांडली आहे. मात्र त्यांनी केलेल्या दाव्यात आपण सुरक्षेची खबरदारी कशी आणि किती घेतो हे देखील महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. विमानतळावर पुरेशी खबरदारी, वेळोवेली सारी यंत्रणा डिसइंफेक्ट करणं, विमानात तापमान योग्य असनं, फिल्टरेशन नीट होणं, कॅबिन सरफेस स्वच्छ असणं तसेच प्रवाशांनी फेस मास्क, फेस शिल्ड घालणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. विमान प्रवासात कोविड-19 संसर्गाचा धोका किती? जाणून घ्या, WHO चे मत.

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी layered risk mitigation strategies चा अभ्यास करण्यात आला होता. यामध्ये मास्कचा, फेस शिल्डचा उपयोग कोरोना संसर्ग धोका कमी करू शकतो का? हे पाहिलं जात होतं. तेव्हा समोर आलेल्या निष्कर्षामधून हा अहवाल मांडण्यात आला आहे. विमानामध्ये प्रवाशांमध्ये, केबिन क्रु आणि प्रवाशांमध्ये पुरेसे अंतर असणं आवश्यक आहे. तसेच फेस्क मास्कचा वापर, सर्व ठिकाणांचे डिसइंफेक्शन करणं आवश्यक आहे. तसेच हावर्डच्या संशोधकांच्या मते केवळ एका पद्धतीचा वापर कोरोना संसर्ग टाळू शकत नाही तर तुम्हांला गरजेनुसार 2-4 पद्धती नियमित आणि एकत्रपणे वापरणं देखील गरजेचे आहे. यामुळे विमान प्रवास सुरक्षित राहु शकतो.

घरागुती वातावरणापेक्षा विमानामध्ये हवेचं व्हेंटिलेशन होण्याची प्रक्रिया ही वेगळी असते. विमानात हवा बाहेर फेकली जात असल्याने प्रवाशांमध्ये हवेमाध्यमातून थेट संसर्ग होण्याचा धोकादेखील कमी आहे. त्यामुळे लोकांना कोरोनाची लक्षणं असली किंवा नसली तरीही त्यांना काळजी घेणं बंधनकारक असलंच पाहिजे. पुरेशी खबरदारी घेतल्याने संसर्गचा धोका कमी होऊ शकतो.