'She is a Man': उपचारादरम्यान 30-वर्षीय महिलेला ती पुरुष असल्याचे आढळले! या दुर्मिळ वैद्यकीय स्थितीबद्दल, जाणून घ्या
बंगालमधील 30-वर्षीय महिलेला ती पुरुष असल्याचे आढळले (Image for representation: PTI)

पश्चिम बंगालमधील (West Bengal) बीरभूम (Birbhum) जिल्ह्यातील 30 वर्षीय विवाहित महिला ओटीपोटात दुखत असल्याची तक्रारीमुळे रुग्णालयात गेली आणि तिला समजले की ती 'पुरुष' असून तिला अंडकोषात कर्करोग असल्याचे समजले. नऊ वर्षांपूर्वी या महिलेचे लग्न झाले होते. काही महिन्यांपूर्वी, ती कोलकाताच्या (Kolkata) नेताजी सुभाषचंद्र बोस रुग्णालयात ओटीपोटात वेदना झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती, जिथे डॉक्टरांनी तिचे टेस्ट केल्यावर महिलेची 'खरी ओळख' उघडकीस आली. या घटनेनंतर महिलेच्या 28-वर्षीय बहिणीचीही आवश्यक टेस्ट आली त्यानंतर तिला 'अँड्रोजन इनसेन्सिव्हिटी सिंड्रोम'चे (Androgen Insensitivity Syndrome) निदान झाल्याचे समजले. एंड्रोजन असंवेदनशीलता सिंड्रोम-अशी एक अवस्था ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म पुरुष म्हणून होतो, परंतु तिची सर्व शारीरिक वैशिष्ट्ये स्त्री सारखी असतात. (Men's Health Tips: घट्ट अंडरवेअर आणि Skinny Jeans मुळे Sperm Count वर परिणाम होऊन Infertility चा धोका वाढतो का?)

"ती दिसण्यासाठी एक स्त्री आहे. तिच्या आवाजापासून, विकसित स्तन, सामान्य बाह्य जननेंद्रियापासून सर्व काही एक स्त्रीसारखं आहे. तथापि, गर्भाशय आणि अंडाशय जन्मापासूनच अनुपस्थित आहेत. तिला मासिक पाळीचा अनुभवही कधी आला नाही," डॉ. अनुपम दत्ता यांनी पीटीआयला सांगितले. ही एक अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे जी 22,000 लोकांमधील एकामध्ये दिसते, ते म्हणाले. चाचणी अहवालात असे सूचित झाले की त्या व्यक्तीला 'अंध योनी' आहे, डॉक्टरांनी कॅरिओटाइपिंग चाचणी करण्याचे ठरविले ज्यामध्ये असे दिसून आले की तिचे गुणसूत्र पूरक 'XY' आहे, परंतु 'XX' नाही.

दरम्यान, सध्या तिची कीमोथेरेपी सुरु असून तिची तब्येत स्थिर आहे. तिच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले असता ते म्हणाले, “ती व्यक्ती एक स्त्री म्हणून मोठी झाली आहे. तिचे एका पुरुषाशी लग्न झाले आहे. सध्या आम्ही तिला आणि तिच्या पतीचे कौन्सिलिंग करत आहोत आणि ते जसे आयुष्य जगले असेल तसेच राहावे असा सल्ला देत आहोत.” या जोडप्याने बर्‍याच वेळा बाळासाठी प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाल्याचे समजले. दरम्यान, भूतकाळात अ‍ॅन्ड्रोजन इन्सेंसिव्हिटी सिंड्रोमचे निदान रूग्णाच्या दोन मावशींनाही झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.