Men's Health Month 2020: अनेकदा वैवाहिक जीवनात एखादे कपल मुलांसाठी प्रयत्न करत असताना जर का यश आले नाही तर महिलेला दोष लावले जातात. मात्र यामागे पुरुषांच्या शरीरात स्पर्म काउंट कमी असणे हे सुद्धा कारण असू शकते. अनेकदा कोणाचा दोष नसूनही ही कमतरता अनुवांशिक येऊ शकते. तर काही वेळा तुमच्या जीवनशैलीतील सवयी तुमच्यासाठी हा धोका निर्माण करत असतात. काही अभ्यासकांच्या माहितीनुसार, घट्ट अंडरवेअर किंवा जीन्स घातल्याने अंडकोषांवर तणाव येऊन शुक्राणूंच्या संख्येवर (Sperm Count) परिणाम होऊ शकतो. यामुळे पुरुषांना वंध्यत्व येण्याइतके गंभीर पडसाद उमटू शकतात. मुळात यासंदर्भात बरेच वाद आहेत. या सिद्धांताला कोणताही आधार नसल्याचे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे, परंतु काही अभ्यासांनी असे सिद्ध केले आहे की घट्ट अंडरवियर अधिक नुकसान पोहोचवू शकते. या दाव्यामागील सत्य काय? आणि यात तथ्य असल्यास काय काळजी घ्यावी हे आपण आज जाणून घेऊयात..How To Increase Sperm Count: शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश; जाणून घ्या नैसर्गिक घरगुती उपचार
घट्ट अंडरवेयर आणि वंध्यत्व यांचा संबंध काय?
काही अभ्यासानुसार घट्ट अंडरवेअर अधिक वेळ वापरल्याने टेस्टिकल्स किंवा अंडकोशाभोवती हवा पोहचत नाही. टेस्टिकल्स जवळ जास्त तापमान निर्माण झाल्याने त्याचा परिणाम स्पर्म च्या संख्येवर होतो. अंडरवेयर चे फॅब्रिक त्वचेवर परिणाम करू शकते. काही अभ्यासांमध्ये असेही आढळले आहे की सैल-कपडे घालणाऱ्यांपेक्षा घट्ट-फिटिंग कपडे घालणार्या पुरुषांमध्ये अंडकोषाजवळ तापमान अधिक प्रमाणात असते. कपडे आणि त्वचेच्या दरम्यान हवेच्या तापमानात वाढ झाल्यामुळे स्पर्म ची वाढच होत नाही.Mens Lifestyle: अशी सुधारा प्रजनन क्षमता, Sperm Count वाढवण्यासाठी करा हे सोपे उपाय
अलीकडेच याबाबत एक अभ्यास करण्यात आला होता. ज्यानुसार काही पुरुषांच्या गटाला सहा महिने घट्ट फिटिंग आणि त्यानंतरच्या सहा महिन्यांत सैल फिटिंग अंतर्वस्त्रे घालण्यास सांगण्यात आले होते. या नंतर या गटाचे वीर्य नमुने घेण्यात आले यात असे दिसून आले की सैल-फिटिंग वर्गाच्या तुलनेत घट्ट फिटिंग प्रकारात शुक्राणूंची संख्या 50% कमी झाली आहे. तसेच वीर्य कमीच नव्हे तर त्याची गुणवत्ता सुद्धा यामुळे प्रभावित होत असल्याचे दिसून आले आहे.
तुम्ही काय करू शकता?
-दिवसात अधिक तास जास्तीत जास्त घट्ट अंडरवेअर घालणे टाळा.
-रात्रीच्या वेळी विना अंडरवेअर झोपणे उत्तम
-कॉटन च्या कापडाची अंडरवेअर निवडा
-शॉर्ट्स आणि ब्रिफ स्वरूपातील अंडरवेअर घाला.
दरम्यान, केवळ कपडेच नव्हे तर तुमचा आहार, शरीराला मिळणारा व्यायाम यानुसार सुद्धा शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यसन करणे टाळा, उत्तेजक पेयांचे प्रमाण कमी करा. सकस आहार घ्या. आणि निदान चालण्याचा तरी व्यायाम करा. शुक्राणूंची संख्या ही वैवाहिक जीवनात समस्या बनू देऊ नका.