बरेचवेळा लग्नानंतर अनेक वर्षे झाली तरी जोडप्यांना मूल होत नाही. अशावेळी गोळ्या. उपचार यांचा आधार घेतला जातो. गर्भधारणेसाठी पुरुष शुक्राणूंची संख्या (Sperm Count) उत्तम असावयास हवी. मात्र सध्याच्या धावपळीच्या काळात या गोष्टीकडे दुर्लक्ष होते. शुक्राणूंची संख्या, त्यांची जलद गती, त्यांची प्रकृती आणि त्यांचे आकारमान हे गर्भधारणेसाठी आवश्यक गुण आहेत. 50 वर्षापूर्वी पुरुषांच्या एक मिलीलीटर सीमनमध्ये शुक्राणूंची संख्या 11 कोटी तीस लाख होती जी आता कमी होऊन मात्र चार कोटी 70 लाख झाली आहे. योग्य तो आहार आणि लाईफस्टाईल यांच्याद्वारे तुम्ही शुक्राणूंची संख्या वाढवू शकता.
- स्मोकिंग सोडा – रिसर्चमध्ये हे आढळून आले आहे की, स्मोकिंग पुरुषांमधील स्पर्म काउंट कमी करते. यासोबतच त्याने स्पर्मच्या गुणवत्तेवरही विपरित परिणाम होतो. म्हणून शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी स्मोकिंग सोडणे आवश्यक आहे.
- व्यायाम करा – तुम्ही स्वतः हेल्दी आणि फिट असाल तर तुमचे स्पर्मही हेल्दी आणि फिट राहतील. यासाठी रोज थोडा तरी व्यायाम करून तुमचे वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.
- स्टीम बाथ - आठवड्यातून एकदा गरम अथवा कोमात पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे दररोज जर का तुम्ही परंतू 40 डि.से. किंवा याहून अधिक तापमानाच्या पाण्याने अंघोळ करत असाल तर ते स्पर्मसाठी धोकादायक आहे.
- घट्ट अंडरवेअर टाळा - सैल कपडे घातले की टेस्टिकल्स किंवा अंडकोशाभोवती हवा खेळती आणि थंड राहते. घट्ट अंडरवेअरमुळे टेस्टिकल्स जवळ जास्त तापमान निर्माण झाल्याने त्याचा परिणाम स्पर्म च्या संख्येवर होतो. त्यामुळे शक्यतो सैल अंडरवेअर वापरा.
- अती कॉफी पिणे टाळा - अधिक कॉफी प्यायल्याने शुक्राणू अंडाषयापर्यंत जाऊन फर्टीलाइज करण्यात कमी पडतात. अनेकदा स्ट्राँग कॉफी पिण्याने स्पर्मच्या संख्येवर परिणाम होतो. याने स्पर्मच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
हे पदार्थ खा –
- लसून - दररोज सकाळी दोन लसणाच्या पाकळ्या ताज्या पाण्यासोबत घेतल्याने स्पर्म काऊंट नक्कीच वाढेल. तसेच यामुळे तुमचे लिव्हर देखील सुदृढ राहते.
- केळ – रोज केळ खाल्ल्याने तुमची एनर्जी नक्कीच वाढते. यामुळे तुमचा स्पर्मची संख्या वाढवण्यास मदत होईल.
- खारका आणि अक्रोड - स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी दररोज आहारात अक्रोड आणि खारकांचा समावेश फायद्याचा ठरतो.
- गाजर - गाजरामध्ये केरोटीन नावाचे रसायन असते, जे शुक्राणूंची संख्या तर वाढवतोच सोबतच त्यांची गुणवत्ताही सुधारतो. पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी गाजर फार फायद्याचे मानले आहे.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)