स्पेन बनला जगातील सर्वात Healthy देश; श्रीलंका, बांग्लादेशनंतर भारत, मिळाले 120 वे स्थान
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

नुकतीच जगातील सर्वात स्वस्थ्य देशांची (Healthiest country) यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये स्पेन (Spain) देशाने प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर इटली (Italy) आहे. जगभरातील 169 देशांचे आरोग्यविषयक मूल्यांकन करण्यात आले होते, त्यानंतर हे रिझल्ट समोर आले आहेत. दक्षिण आशियाई देशांबद्दल बोलायचे झाले तर, भारताचे स्थान मागील वर्षापेक्षा एकने कमी झाले आहे. 2017 मध्ये भारत 119 व्या क्रमांकावर होता, आणि 2018 मध्ये भारत 120 व्या क्रमांकावर आला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या रँकिंगमध्ये भारत श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळच्याही मागे आहे. या यादीत श्रीलंका 66 व्या, बांग्लादेश 91 आणि नेपाल 110 व्या स्थानावर आहे.

ब्लूमबर्ग हेल्दीएस्ट कंट्री इंडेक्स 2019 एडिशन अंतर्गत जगातील 169 देशांना या यादीमध्ये समाविष्ट केले गेले होते. भारताचा शेजारी देश चीनही या यादीमध्ये भारताच्या पुढे आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत चीनने चांगली प्रगती आहे. 2017 मध्ये चीनचा 55 वा क्रमांक होता, तर आता 2018 मध्ये चीन 52 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही यादी बनवण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार केला गेला आहे. यामध्ये लोकांचे एकूण स्वास्थ्य याशिवाय संक्रामक आणि गैर-संक्रमक रोगांमुळे होणारे मृत्यू, एकूण आयुर्मान यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. (हेही वाचा: आता लघवीचा रंग आणि वासावरून ओळखा कसे आहे तुमचे आरोग्य)

अमेरिका अशा देशांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे जे आपल्या नागरिकांच्या प्रति व्यक्ती आरोग्यावर सर्वात जास्त म्हणजे 11 हजार डॉलर्स खर्च करते, तरीही या यादीमध्ये अमेरिकेचा क्रमांक 35 वा आहे. मागील 3 वर्षापूर्वी अमेरिकन लोकांचे सरासरी आयुर्मान कमी होताना दिसत आहे. इंग्लड त्यांच्या नागरिकांवर प्रति व्यक्ती 4 हजार डॉलर्स खर्च करत आहे. स्पेन आणि इटली हे दोन्ही देश हेल्थकेयरवर प्रति व्यक्ती 3500 डॉलर खर्च करतात, तर भारत हेल्थकेयरवर प्रति व्यक्ती केवळ 240 डॉलर्स खर्च करतो. या यादीमध्ये नागरिकांच्या आरोग्यावर 70 टक्केपेक्षा जास्त खर्च करणाऱ्या देशांमध्ये आइसलँड, जपान, स्वित्झर्लंड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि नॉर्वेसारखे देश समाविष्ट आहेत जे टॉप 10 च्या यादीमध्ये आहेत.

टॉप 10 देश -

  1. स्पेन
  2. इटली
  3. आइसलँड
  4. जपान
  5. स्वित्झर्लंड
  6. स्वीडन
  7. ऑस्ट्रेलिया
  8. सिंगापूर
  9. नॉर्वे
  10. इस्रायल