
Lakshmi Pujan Wishes in Marathi: दिवाळी ( Diwali 2023) किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशकंदिल लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. दिवाळी लक्ष्मीपूजना चा दिवस फार महत्वाचा असतो. पुराणकथेनुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. ज्या ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह अशा सकारात्मक बाबी असतात तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. म्हणूनच या दिवशी सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. यंदा 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे.
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपल्या नातेवाईकांना , मित्रपरिवाराला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत खास मराठमोळे SMS, Messages, Greetings, GIFs, Images, WhatsApp Stickers. (हे देखील वाचा: Happy Diwali 2023 Wishes in Marathi: दिवळी निमित्त Quotes, WhatsApp Status, Messages, Greetings शेअर करत आप्तेष्ठांना द्या दीपावलीच्या शुभेच्छा)
उंबरठा ओलांडून आज,
लक्ष्मी येईल घरोघरी..
भक्तीभावे होईल लक्ष्मीपूजन,
घर चैतन्याने जाईल भरून..
लक्ष्मी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा..!

महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!

दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी..
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी..
दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

रांगोळीच्या सप्तरंगात,
सुखाचे दीप उजळू दे..
लक्ष्मीच्या पावलांनी,
घर सुख-समृद्धीने भरू दे..
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

समईच्या शुभ्र कळ्या लक्ष्मीपूजनी तळपती,
दिवाळीच्या पणतीने, दाही दिशा झळकती..
लक्ष्मीपूजनच्या आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो..
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा…!

लक्ष्मी आली सोनपावली,
उधळण झाली सौख्याची..
धन-धान्यांच्या भरल्या राशी,
घरी नांदू दे सुख-समृद्धी..!
लक्ष्मी पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला व तुमच्या परिवारास
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर,
सदैव कृपा राहो..
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

पुराणानुसार, समुद्रमंथनाच्या वेळी कार्तिक महिन्याच्या अमावास्येला देवी लक्ष्मी प्रकट झाली होती, तर वाल्मिकी रामायणानुसार या दिवशी माता लक्ष्मीचा विवाह भगवान विष्णूशी झाला होता. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्त्व आहे.