viral Video: बाजाराता आली कॉफी मॅगी, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Coffee Maggie VIral

viral Video: गेल्या काही दिवसांपूर्वी आईस्क्रिम आणि डोसा असा फुड कॉम्बो व्हायरल झाला होता. मॅगीचे अनेक प्रकार आज पर्यंत व्हायरल झाले. मॅगीसोबत अनेक पदार्थ मिक्स करून खाल्ले जातात आणि ते लोकप्रिय होतात. दरम्यान पुन्हा एकदा मार्केटमध्ये नवी फुड कॉम्बो आला आहे. एका रस्त्यात फुड स्टॉल विक्रेत्याने चक्क कॉफी मॅगी बनवली आहे. कॉफी मॅगीचा व्हिडिओ पाहून युजर्स हैराण झाले आहेत. एकादी डिश लोकप्रिय होण्यासाठी लोक नवनवीन पदार्थाला मिक्स करून काहीतरी नवीन पदार्थ बनवत राहतात. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा कॉफी मॅगीची रेसिपी पाहाण्यात आली आहे. हेही वाचा- बाजारात आलाय नवीन ट्रेंड, आईस्क्रिम आणि डोश्याचं विचित्र कॉम्बिनेशन

एका इन्स्टाग्रामच्या पेजवर कॉफी मॅगीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहे. तर काही जण या फुड कॉम्बोला विचित्र नाव देत आहे. कॉफी मॅगी फुड कॉम्बो हा बाजारात नवीन आला आहे असं एकाने कंमेट केले आहे. यमराजसे मिलनेका तरीका थोडा कॅज्युलस है असं एकाने कंमेट केले आहे. एका यूजरने कमेंट केली की, “मॅगीचा नेहमी बळी का दिला जातो

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, विक्रेत्याने दुध उकळवले आणि त्याच मॅगीचा पॅकेट फोडून टाकला. पुढे तो चिरलेला टोमॅटो, सिमला मिरची आणि कांदा टाकतो आणि वर मॅगी मसाला शिंपडतो. साहित्य चांगले मिक्स केल्यानंतर, तो एक चमचा कॉफी पावडर घालतो. कॉफी मॅगी बनववणे लोकप्रिय ठरेल का असा प्रश्न युजर्सना पडला आहे.