Weird Food Combinations:  बाजारात आलाय नवीन ट्रेंड, आईस्क्रिम आणि डोश्याचं विचित्र कॉम्बिनेशन (Watch Video)
weird food combinations ice cream and Dosa PC INSTA

Weird Food Combinations: आज अनेक फुड कॉम्बो तुम्ही खाल्ले असतील जसं की, मोमोस आइस्क्रीम रोल, मॅगी आणि कोक, मॅगी आणि आईस्क्रीम. असं विचित्र कॉम्बो असलेलं पदार्थ काही जण नियमीत खातात. स्ट्रिट फुडसाठी अनेक प्रयोग केले जातात. त्यातले काही पदार्थ हे लोकांना नक्कीच पसंंतीत पडतात. तुम्ही कधी डोसा सोबत आईस्क्रिम खालयं का? असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात  आईक्रिम आणि डोसा असा कॉम्बो दिसत आहे. व्हायरल झालेला हा फुड कॉम्बो पाहून अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (हेही वाचा- सोन्याची फोडणी घातलेली ‘दाल फ्राय’, पाहा एका वाटीची किंमत (Watch Video)

एका युजर्सनी हा व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एका विक्रेत्याने आईस्क्रम आणि डोसा मिसळून आईस्क्रिम डोसा तयार केला आहे. हा फुड कॉम्बिनेशन एका स्टोलवर विकला जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. "हे बनवणाऱ्याला तुरुंगात टाका." तर दुसरा वापरकर्ता म्हणाला, "या व्यक्तीला तुरुंगात टाका... नाहीतर हा व्हायरस संपूर्ण भारतात पसरेल."

 

View this post on Instagram

 

A post shared by @foodb_unk

डोसा आणि त्यावर आईस्क्रिम सोबत चॉकलेट सीरप असा फुड कॉम्बो पाहून कोणालाही विचित्रच वाटेल. या ट्रेंड आधी मॅगी आणि आइस्क्रिमचा कॉम्बो व्हायरल झाला होता. लोकांना या व्हिडिओला देखील अनेक प्रतिक्रिया दिल्या होत्या. डॉक्टरांच्या मते, असे काही फुड कॉम्बो खाणे आरोग्यासाठी धोकादायक असू शकातो.