Sachin Tendulkar On Mumbai's Street Food: सचिन तेंडुलकर यांची मंबईतील 'स्ट्रीट फूड'बद्दल सोशल मीडियावर नॉस्टॅल्जिक पोस्ट
Sachin Tendulkar On Food | (Photo credit: archived, edited, representative image)

Mumbai Street Food: प्रत्येक भारतीयासाठी, स्ट्रीट फूडला एक विशेष स्थान आहे. त्यामुळे प्रत्येक प्रदेश या पदार्थांना अद्वितीय पसंती दर्शवतो. जसे की, महाराष्ट्राची पुरणपोळी, बंगाली फुलके,र उत्तर भारतीय आणि दिल्लीवासी गोल गप्पा वगैरे वगैरे. अनेकदा पदार्थांमध्ये समानता असूनही त्यांच्यातील पाकककृती त्यांना परस्परांपासून गुणवैशिष्ट्यांसह भिन्न करते. असेच मुंबईतील स्ट्रीट फूड (Sachin Tendulkar On Mumbai's Street Food) सुद्धा तितकेच प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये वडा पाव ते शेवपुरी आणि मिसळ अशा असंख्य पदार्थांचा समावेश आहे. मुंबईचे स्ट्रीट फूड आता जागतिक स्तरावर उपलब्ध आहे. अशाच मुंबईच्या स्ट्रीट फूडबद्दल क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी नुकतेच आपले प्रेम व्यक्त केले. त्यासाठी त्यांनी आपल्या इंन्स्टाग्राम हँडलवर नॉस्टॅल्जियाची झलक दिली. मुंबईतील स्ट्रीट फूडबद्दलचे त्याचे प्रेम इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या नॉस्टॅल्जिक पोस्टमधून चाहत्यांपर्यंत पोहोचते आहे.

सचिन तेंडुलकर यांनी काय म्हटले पोस्टमध्ये

इंस्टाग्रामवर सक्रिय असलेल्या सचिनने न्यूयॉर्कच्या रस्त्यावर कागदात गुंडाळलेल्या स्ट्रीट फूडचा आस्वाद घेत स्वत:चे थ्रोबॅक चित्र पोस्ट केले. नेमकी डिश गूढ राहिली असली तरी, पोस्ट मुंबईच्या स्ट्रीट फूड प्रकाराकडे इशारा करते. त्यांनी आपल्या फोटोला पोस्टमध्ये दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "मुंबईकराला त्याचे स्ट्रीट फूड आवडते, मग तो कुठेही गेला तरी!'' सोबत त्यांनी #throwback #newyork #foodie #streetfood असे हॅशटॅगही जोडले आहेत. दरम्यान, जर तुम्ही तेंडुलकरांची स्ट्रीट फूडची आवड शेअर करत असाल, तर मुंबईच्या काही प्रतिष्ठित पदार्थांची चव तुम्ही नक्कीच चाखू शकता. शहरातील पाच सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड खालील प्रमाणे:

वडा पाव: मुंबईचा मुख्य पदार्थ, वडा पाव, एक साधा पण स्वादिष्ट सँडविच आहे. ज्यामध्ये बटाट्याचे काप, लसूण चटणी आणि हिरवी मिरची सोबत लादी पावाच्या तुकड्यांमध्ये भरलेले असते. हा एक पौष्टिक आणि समाधानकारक नाश्ता मानला जातो. (हेही वाचा, नैसर्गिक संतुलित आहार आणि जीवनशैली कशी स्वीकाराल?)

मिसळ पाव: हा पदार्थ मोड आलेली मटकी आणि मसालेदार रस्सा यांमध्ये बटाट्याचा चिवडा, फरसाण किंवा शेव, कांदे, लिंबू आणि धणे घालून केलेले मीश्रण आहे. त्यासबत बटर लावलेला पाव बरोबर दिला जातो, त्याचा नाश्ता किंवा पूर्ण जेवण म्हणून आनंद घेता येतो. (हेही वाचा, Aamras Tops List of World's Best Mango Dishes: जगातील सर्वोत्कृष्ट मँगो डिशेसमध्ये 'आमरस'ने पटकावला पहिला क्रमांक; Taste Atlas ने जारी केली यादी)

सचिन तेंडुलकर इन्स्टाग्राम पोस्ट

दाबेली: मुंबई आणि गुजरात या दोन्ही ठिकाणी लोकप्रिय आहे. दाबेली हे आलू मसाला, मसालेदार लसूण चटणी आणि पाव कापांमध्ये दाबलेले विविध पदार्थ असलेले देसी सँडविच आहे. हे तिखट चिंचेची चटणी, भाजलेले शेंगदाणे आणि डाळिंब सोबत सर्व्ह केले जाते.

मसाला टोस्ट: मुंबईच्या मसाला टोस्टमध्ये हिरवी चटणी, मसाला आणि आलू यांचा समावेश असलेल्या क्लासिक सँडविचवर देसी ट्विस्ट आहे. हे चवदार टोस्ट कायमची छाप सोडेल याची खात्री आहे.

शेव पुरी: शेव पुरीमध्ये कांदे, उकडलेले बटाटे आणि तीन प्रकारच्या चटण्या - चिंच, मिरची आणि लसूण, भरपूर शेव असलेल्या कुरकुरीत तळलेल्या पुरी असतात. कच्चा आंबा, लिंबाची फोड आणि चाट मसाला वापरून ते वाढवता येते.

वरीलपैकी कोणत्याही स्ट्रीटफूडचा आनंद आपण मुंबईच्या कोणत्याही रस्त्यावर घेऊ शकता. खिशाला अत्यंत किफायतशिर आणि गुणवत्तेच्या बाबतीत म्हणाल तर अप्रतिम. अशा फूडचा आपण मुंबईत गेल्यावर नक्की आनंद घ्यायला हवा.