Viral Video: फुड व्लॉगरने बनवला 'केळीच्या पानांचा शिरा', रेसिपी पाहून नेटकरी म्हणाले 'पुन्हा प्रयत्न करू नकोस'
“Banana Leaf Halwa PC INSTA

Viral Video: महाराष्ट्रात शिरा हा सर्वांत उत्तम आणि हेल्ही नास्ता रेसिपी आहे. लोक मोठ्या आवडीने शिरा खातात. शिरा हा सत्यनारायणाच्या पूजेसाठी बनवला जाणारा प्रसाद सर्वांच्या आवडीचा आहे. केळी आणि ड्रायफ्रुड अॅडकडून अनेक वेगवेगळ्या फ्लेवरचा शिरा बनवला जातो. रव्यापासून आणि गव्हाच्या पिठापासून तयार झालेला शिरा तर तुम्ही खाल्ला असला. मात्र तुम्ही कधी केळीच्या पानांचा शिरा बनवताना पाहिला आहे का? त्याची चव कशी असेल माहित आहे का? सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात रव्याचा नाही तर केळीच्या पानाचा शिरा बनवला आहे.  (हेही वाचा- मंदिरात पूजेदरम्यान तरुणाने डोक्यावर फोडला नारळ

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तरुणाने केळीचे पान घेतले ते स्वच्छ धुतल्यानंतर पानांच्या शिरा कापल्या. पानांचा रोल बनवून ते बारिक बारिक तुकडे कापले. तुकडे एका मिक्सरच्या जारमध्ये टाकले आणि दळून त्याची पेस्ट तयार केली. पेस्ट बनवल्यानंतर सफेज रंगाच्या सुती कापडात पेस्ट ओतली आणि त्यातील सर्व पाणी बाहेर काढले. पेस्ट मधील पाणी एका वेगळ्या पातेल्यात काढले.

पुढे त्याने एका पॅनमध्ये तुप टाकलं आणि तूप गरम झाल्यानंतर पानांचे गाळलेले पाणी टाकले. त्यानंतर त्यात साखर एक चिमुट मीट आणि एका वाटीत पाणी आणि कॉर्न फ्लावर पीठ मिक्स केले. शिजल्यानंतर त्याल आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स मिक्स केले. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर  @great_indian_asmr याने पोस्ट केला आहे. व्हिडिओला अनेकांनी कंमेट केले आहे. अनेकांनी या व्हिडिओला कंमेट करत शेअर केले आहे.