Dishes Causing Damage to Biodiversity: सिंगापूरमध्ये नुकत्याच झालेल्या एका नवीन अभ्यासात असे समोर आले आहे की, जगभरातील 25 खाद्यपदार्थ जैवविविधतेसाठी धोकादायक आहेत. यामध्ये भारतातील काही पदार्थांचाही समावेश आहे. जगभरातील 151 लोकप्रिय खाद्यपदार्थांचा जैवविविधतेवर होणारा परिणाम पाहण्यासाठी हा अभ्यास केला गेला आहे. हा अभ्यास PLOS One या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. यामध्ये शास्त्रज्ञांनी स्पेनच्या ‘लेचाझो’ची जैवविविधतेला सर्वाधिक हानी पोहोचवणारी डिश म्हणून निवड केली आहे. यामध्ये भारतामधील इडली, राजमा (किडनी बीन्स) यांचा समावेश आहे. या अभ्यासात असे म्हटले आहे की, शाकाहारी पदार्थांपेक्षा मांसयुक्त पदार्थांचा जैवविविधतेवर जास्त परिणाम होतो.
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमधील जैविक विज्ञानाचे सहयोगी प्राध्यापक लुईस रोमन कॅरास्को म्हणाले की, प्रत्येक डिशचा त्याच्या घटकांवर अवलंबून असलेल्या प्रजाती आणि वन्य सस्तन प्राणी, पक्षी आणि उभयचरांवर परिणाम होतो. जैवविविधतेवर हा होणारा परिणाम त्या प्रजातींच्या संख्येचे प्रतिनिधित्व करतो. म्हणजेच त्या डिशच्या उत्पादनासाठी जैवविविधतेवर कितपत नकारात्मक परिणाम झाला आहे किंवा ती डिश खाऊन किती प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत हे समजण्यासाठी हा अभ्यास महत्वपूर्ण ठराव. (हेही वाचा; viral Video: बाजाराता आली कॉफी मॅगी, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप)
#MCTrends | 🌍 Study Reveals: Idli and rajma among the top 25 dishes causing damage to biodiversity. 🍛🔍
Find out more about the study⏬https://t.co/tu6Ng1ijsv#Biodiversity #Food #Environment #Idli #Rajma
— Moneycontrol (@moneycontrolcom) February 25, 2024