मिल्कशेक (Photo Credit : Pixabay)

उपवसाच्या काळात सकाळी नाश्त्याला काय खावे हा प्रश्न पडतो? त्यात सकाळीच्या गडबडीत वेगळे काही बनवण्यासाठी वेळही नसतो. पण सकाळचा नाश्ता हा अतिशय महत्त्वाचा. तो टाळल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्धवू शकतात. म्हणूनच सकाळच्या गडबडीच्या वेळातही अगदी झटपट होणारा आणि भूकेवर नियंत्रण मिळवून देणारा एक पदार्थ पाहुया. चुकवू नका सकाळचा नाश्ता, नाहीतर या 5 आजारांशी करावा लागेल सामना

केळं आणि खजूर हे पदार्थ आपल्या घरात आवर्जून आढळतात. मग दिवसाची सुरुवात त्यापासून झटपट होणारा मिल्कशेक पिऊन करा. या दोन्ही घटकांमधून शरीराला उर्जा मिळते. खजूरामधील मिनरल्स आणि आयर्नचा मुबलक साठा नैसर्गिकरित्या हिमोग्लोबीन वाढवण्यास मदत करते. तर केळं वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तर पाहुया केळ-खजूर मिल्कशेक रेसिपी... आरोग्याचं गणित सांभाळत नवरात्रीत उपवास कसा कराल ?

साहित्य

4-5 खजूर (बिया काढलेले)

ग्लासभर दूध

एक केळं

2-3 बदाम

कृती

-मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पदार्थ एकत्र करुन त्याची स्मुथी बनवा.

-गरजेनुसार त्यात दूध मिसळू शकता.

-खजूर आणि केळं दोन्ही चवीला गोड असल्याने त्यामध्ये गोडवा वाढवण्यासाठी अतिरिक्त साखर किंवा गूळ घालायची गरज भासत नाही. त्यामुळे तुमचे वजनही आटोक्यात राहण्यास मदत होते.

टीप : केळं घरात नसल्यास तुम्ही फक्त खजूराचा मिल्कशेकदेखील बनवू शकता. तसेच काळा मस्कदी खजूर हा नरम व बियाविरहित असल्याने तो तुम्ही थेट वापरू शकता. पण चॉकलेटी आणि कडक खजूर घरात उपलब्ध असल्यास तो रात्रभर थोड्या पाण्यात भिजवून सकाळी दूधात वाटून मिल्कशेक बनवा. तुम्ही हे ही ट्राय करु शकता ः झटपट होणारे खजूराचे हेल्दी टेस्टी लाडू !