नवरात्रोत्सव 2018 : झटपट होणारे खजूराचे हेल्दी टेस्टी लाडू !
खजूराचे लाडू (File Photo)

नवरात्रोत्सवाचा आज तिसरा दिवस. म्हणजेच उपवासाचाही आज तिसरा दिवस. उपवासाच्या दिवसात नेमकं काय खावं? हा प्रश्नच असतो. तर कधी वेळे अभावी विकतचे, अनहेल्दी पदार्थ खाले जातात.  पण उपवासाचा आरोग्यावर परिणाम होऊ न देता काही हेल्दी पदार्थांचा फराळात समावेश करणे गरजेचे आहे. म्हणूनच तुमच्यासाठी हा झटपट पर्याय.  खजूराच्या हेल्दी टेस्टी लाडवांची खास रेसिपी... मधुमेह, रक्तदाब, हृद्यविकाराच्या रूग्णांनी उपवास करताना कोणती काळजी घ्यावी ?

साहित्य

खजूर- एक वाटी (बिया काढलेले)

तूप- 2 चमचे

खारीक पावडर- 2 चमचे

भाजलेलं खोबरं- अर्धा वाटी

कृती

- सर्वप्रथम पॅनमध्ये तूप घालून त्यात खजूर भाजून घ्या.

- मिश्रण काहीसं थंड झाल्यानंतर त्यात खारीक पावडर आणि भाजलेलं खोबरं घाला.

- या मिश्रणाचे लहान लहान लाडू वळा.

मधल्या वेळी लागणाऱ्या लहानशा भूकेसाठी हे लाडू उत्तम पर्याय आहेत. चवीला उत्कृष्ट असणारे हे लाडू हेल्दी देखील आहेत. उपवासाला असे बनवा साबुदाण्याचे स्प्रिंग रोल्स !