नवरात्रोत्सव 2018 : उपवासाला असे बनवा साबुदाण्याचे स्प्रिंग रोल्स !
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Pixabay)

नवरात्रोत्सवाचा आज दुसरा दिवस. नवरात्रोत्सवात अनेकजण नऊ दिवस उपवास करतात. उपवासाच्या या नऊ दिवसात रोज उपवासाचे काय खायचे हा प्रश्नच असतो. म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत उपवासाचे काही हटके पदार्थ. साबुदाण्याची खिचडी, वडे तुम्ही खाले असतील. पण साबुदाण्याचे स्प्रिंग रोल्स कधी खालेत का? मग अशा सोप्या पद्धतीने बनवा साबुदाण्याचे स्प्रिंग रोल्स....  आरोग्याचं गणित सांभाळत नवरात्रीत उपवास कसा कराल ?

साहित्य

- भिजवलेला साबुदाणा – 1 कप

- लिंबाचा रस – 2 टेबलस्पून

- चिरलेली हिरवी मिरची – 2

- एक वाफावलेलं मध्यम आकाराचं रताळं

- चिरलेली कोथिंबीर

- चवीपुरता मीठ

- पाव कप शेंगदाण्याची पूड

स्प्रिंग रोलचे आवरण बनवण्यासाठी

- बटाट्याचं पीठ – 2 कप

- गरजेनुसार पाणी

कसे बनवाल स्प्रिंग रोल्स ?

- एका पसरट पातेल्यामध्ये भिजवलेले साबुदाणे, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्या, वाफवलेलं रताळं, चिरलेली कोथिंबीर, शेंगदाण्याची पूड व मीठ एकत्र करा.

- आवरण बनवण्यासाठी बटाटयाच्या पीठामध्ये पाणी मिसळून घट्ट गोळा मळून घ्या.

- थोड्या वेळाने या पीठाचे लहान लहान गोळे करून आयताकृती आवरण लाटा.

- लाटलेल्या आवरणामध्ये मिश्रण भरून कडा बंद करा.

- स्प्रिंग रोल्स वाफवण्यासाठी स्टीमर किंवा अर्धा टोप पाण्यावर चाळण ठेवून त्यावर स्प्रिंग रोल्स ठेवा. हे रोल्स किमान 7-10 मिनिटं वाफवा.

चटणीसाठी साहित्य

- अळशी – 1 टीस्पून

- सूर्यफुलांच्या बीयांची पूड – 1 टीस्पून

- दही एक कपभर

- चवीनुसार मीठ

- एक हिरवी मिरची

कशी बनवाल चटणी?

चटणीसाठी अळशी, सूर्यफूलांच्या बीयांची पूड, दही, मिरची आणिमीठ मिसळून मिक्सरमध्ये सारे मिश्रण बारीक वाटा. ही चटणी तुम्ही उपवासाशिवाय इतर दिवशी खाऊ शकता. उपवासाच्या वेळेस तुम्ही खोबरं आणी शेंगदाण्याची पूड वापरून चटणी बनवू शकता. त्याचबरोबर साबुदाण्याचे स्प्रिंग रोल्स तुम्ही फक्त दह्यासोबतही खाऊ शकता. कसे बनवाल उपवासाचे कटलेट्स?