नवरात्रोत्सव 2018 : कसे बनवाल उपवासाचे कटलेट्स?
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Pixabay)

आजपासून नवरात्रोत्सवाची धूम सुरु झाली. दांडीया, गरबा यांच्या धुमधडाक्यात या काळात उपवास करणारीही अनेक मंडळी असतात. पण उपवासाचे तेचतेच पदार्थ खावून कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी हटके, चटपटीत पदार्थ नक्कीच वेगळेपणा आणतील. तर पाहुया उपवासाचे कटलेट्स बनवण्याची साधी सोपी रेसिपी... आरोग्याचं गणित सांभाळत नवरात्रीत उपवास कसा कराल ?

साहित्य

उकडलेली कच्ची केळी

उकडलेला बटाटा

वरीचे पीठ

हिरव्या मिरच्यांची पेस्ट

काजूचे तुकडे

मीठ

शेंगदाण्याचा कूट

लिंबाचा रस

तूप

कृती

- एका भांड्यात उकडलेली कच्ची केळी, उकडलेला बटाटा, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट, मीठ, लिंबाचा रस, काजूचे तुकडे या सर्वांचे मिश्रण एकजीव करून घ्यावे.

- या मिश्रणाचे चपटे कटलेट्स तयार करून घ्यावेत.

- तयार झालेले कटलेट्स वरीच्या पीठात घोळवून शॅलोफ्राय करावेत.