World Milk Day 2020: जागतिक दूध दिन- महत्त्व, इतिहास आणि कार्यक्रम
World Milk Day 2020 | (Photo Credits: File Image)

World Milk Day 2020: आज 1 जून. जागतिक दुग्ध दिन (World Milk Day). आज जगभरात जागतिक दूध दिवस (World Milk Day) साजरा केला जातो. दूध हा एक जीवनावश्यक घटक मानला जातो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दूधाची आवश्यकता असते. पाण्यानंतर कदाचित अधिकृतरित्या प्यायला जाणारा दूध हाच एकमेव पदार्थ असावा. पण, असे असले तरी जसे निसर्गात मोफत मिळत असूनही अनेकांना मिळत नाही. त्याच पद्धतीने दूधही अनेकांना मिळत नाही. खास करुन बालके, महिला आणि वृद्ध नागरिकांना. मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो.

का साजरा केला जातो जागतिक दुग्ध दिन?

प्रत्येक वर्षी जगभरात 1 जून या दिवशी जागतिक दुग्ध दिन साजरा केला जातो. 2001 पासून जागतिक दुग्ध दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. 1 जून या दिवशीच दूध दिवस साजरा करण्यात येऊ लागला याचे कारण असे की, अनेक देशांमध्ये याच तारखेला दुग्ध दिवस साजरा केला जात असे. सर्वासामान्य नागरिकांना दूधाबद्दल माहिती कळावी आणि जगभराती देशांना दुधाचे महत्त्व ध्यान्यात यावे यासाठी हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. (हेही वाचा, दूध पिण्याआधी चुकूनही खाऊ नका या '5' गोष्टी, शरीरावर होऊ शकतो विपरित परिणाम)

दूधातून मिळणारे घटक

दूध हा पदार्थ आपल्या आयुष्यात महत्त्वाचे आहे. कारण, ते मानवी शरीराला आवश्यक असे महत्त्वाचे घटक उपलब्ध करुन देऊ शकतो. दूधामध्ये मानवी शरीरास पोषख असे अनेक घटक असतात. ते खालील प्रमाणे

  • कॅल्शियम
  • मॅगनिशियम
  • झिंक
  • फॉस्फरस
  • ऑयोडीन
  • आयर्न
  • पोटॅशियम
  • फोलेट्स
  • व्हिटॅमिन ए
  • व्हिटॅमिन डी
  • राइबोफ्लेविन
  • व्हिटॅमिन बी12
  • प्रोटीन
  • आरोग्यदाई फॅट

दूध हा अधिक ऊर्जा देणारा पदार्थ आहे. दूध प्यायल्याने मानवी शरीरात कमी वेळात जास्त उर्जा उत्पन्न होऊ शकते. कारण, दुधात अधिक मात्रेत प्रोटीन असते. जगभरातील अनेक देश दूध उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातही धवलक्रांती म्हणजेच दूध वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य सरकारच्या माध्यमातून केले जाते.