World Animal Day 2020: वसई (Vasai) आणि विरार (Virar) येथे उद्या (4 ऑक्टोंबर) मांसची विक्री आणि कत्तल करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कारण उद्या जागतिक प्राणी दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिकेकडून कत्तल आणि मांस विक्रीवर 2 आणि 4 तारखेला बंदी असणार असल्याची सुचना देण्यात आली होती. तर 2 ऑक्टोंबरला गांधी जयंती असल्याने त्यासाठी परवानगी नव्हती.(World Animal Day: जागतिक पशू दिन का साजरा केला जातो ? जाणून घ्या महत्व आणि इतिहास)
मांस विक्री आणि कत्तलसाठी 2 आणि 4 ऑक्टोंबरला बंदी असणार असल्याचे निर्देशन महापालिकेचे आयुक्त विजयकुमार दवसे यांनी दिले होते. ही नोटिस 30 ऑक्टोंबरला जाहीर करण्यात आली होती. पण 1 ऑक्टोंबर रोजी ती कत्तलखान्यांना दिली गेल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमधून सांगण्यात आले आहे. आदेशानुसार, अॅनिमल बोर्ड ऑफ इंडिया यांनी सप्टेंबर 2019 मध्ये काढलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार, 2 ऑक्टोंबर आणि 4 ऑक्टोंबरला प्राण्यांची कत्तल आणि विक्रीवर गांधी जयंती आणि वर्ल्ड अॅनिमल डे दिवशी बंदी असणार असल्याचे स्पष्ट केले होते.(International Tiger Day 2020: जागतिक व्याघ्र दिन निमित्त जाणून घ्या 'वाघ' बद्दल काही खास गोष्टी)
वर्ल्ड अॅनिमल डे हा प्राण्यांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी साजरा करण्यात येतो. जगभरात हा दिवस 4 ऑक्टोंबरला पार पडतो. असिसीचे संत फ्रान्सिस हे प्राण्यांवर अतिशय प्रेम करायचे. त्यामुळेच 4ऑक्टोंबर हा त्यांचा उत्सव दिन साजरा केला जातो. 1931 रोजी फ्लोरेंस, इटली येथे पर्यावरण शास्रज्ञांची एक परिषद भरली होती. त्यात धोक्यात आलेल्याा प्राण्यांवर सविस्तर चर्चा झाली. याच कारणास्तव जागतिक प्राणी दिन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली आहे.