World Animal Day 2019: जागतिक पशू दिन का साजरा केला जातो ? जाणून घ्या महत्व आणि इतिहास
World Animal Day (Photo Credits-Pixabay)

World Animal Day 2019: प्राण्यांच्या प्रति प्रेम आणि त्यांच्या स्थितीबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी 4 ऑक्टोंबरला 'जागतिक पशू दिन' साजरा करण्यात येतो. या दिवशी नष्ट होणाऱ्या विविध प्राण्यांच्या प्रजाती वाचवण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती करण्यात येते. जागतिक पशू दिन आयसीसीचे सेंट फ्रांसिस (St. Francis Of Assisi) यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा करण्यात येतो. सेंट फ्रांसिस हे पशु प्रेमी आणि प्राण्यांसाठी एका संरक्षकाप्रमाणे काम करायचे. या दिवशी प्राण्यांच्या प्रति राग, प्राण्यांच्या संबंधित अधिकार याबाबत काही मुद्द्यांवर जागृकता निर्माण करण्यावर अधिक भर दिला जातो. तर 1970 ते 2010 मध्ये जवळजवळ 40-50 वर्षात प्राण्यांची स्थिती काळानुसार बदलत गेली आहे. एवढेच नाही तर प्राण्यांच्या संख्येत 50 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

एका सर्वेक्षणाच्या रिपोर्टनुसार, धार्मिक उद्देश किंवा अन्य कारणास्तव जगभरातील जवळजवळ 56 अरब जनावरांची हत्या करण्यात आली होती. लोकांकडून आपल्या स्वार्थासाठी सातत्याने जनावरांचा बळी दिला जात असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. तर जाणून घ्या जागतिक पशू दिन का साजरा केला जातो आणि त्याचे महत्व काय आहे.

जागतिक पशू दिन इतिहास

असे मानले जाते की, पशु दिन हा प्रथम जर्मन लेखक हेनरिक जिमर्मन यांनी साजरा केला होता. तसेच 4 ऑक्टोंबरला महान पशु प्रेमी आसीसी यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची परंपरा 1931 मध्ये इटली मधील फ्लोरेंस येथून करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांनी देशाच्या कल्याणासंबंधित एक आवाहन करत काही अभियान सुरु केली होती. त्यानंतर हळूहळू जागतिक पशू दिन जगभरात साजरा केला जातो.(हेही वाचा- #Video: कल्याण मध्ये भर रस्त्यात आढळला दोन तोंडाचा घोणस साप)

जागतिक पशू दिनाचे महत्व काय?

जागतिक पशून दिनाचे मूळ महत्व म्हणजे जगातील प्राण्यांच्या प्रजाती होणाऱ्या प्रजाती वाचवण्यासंबंधित जनजागृती करणे होय. तसेच प्राण्यांच्या प्रति आदर आणि प्रेम निर्माण करणे हे सुद्धा यामागील एक कारण आहे. जागतिक पशू दिनाच्या निमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांच्या माध्यमांतून प्राण्यांच्या बाबत जागृकता अभियानाचे आयोजन करण्यात येते.

खरतर जागतिक पशू दिन जगभरातील लोकांना प्राण्यांच्या प्रति प्रेम दर्शवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी व्यक्तिगत पशू कार्यकर्ता, पशू कल्याण संघटना किंवा पशू प्रेमी यांच्या तर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांच्यादरम्यान मानवी आयुष्य आणि पर्यावरण यांच्यामधील संतुलन कायम कसे राखावे याबाबत अधिक माहिती दिली जाते.