Happy Mahashivratri 2024 HD Images: महाशिवरात्री (Mahashivratri 2024) हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. आज सर्वत्र महाशिवरात्रीचा (Mahashivratri) सण मोठ्या उत्सवात साजरा होत आहे. या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि विधीपूर्वक महादेवाची पूजा करतात. महादेवाच्या प्रत्येक भक्ताला महाशिवरात्रीच्या उत्सवाची प्रतीक्षा असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व भाविक महाशिवरात्रीनिमित्त उपवासासह शिवाची पूजा-अर्चा करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाहीत.
तुम्हालाही या शुभ प्रसंगी तुमच्या प्रियजनांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा पाठवायच्या असतील. म्हणून या लेखाद्वारे आम्ही तुमच्यासाठी मराठीमध्ये महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देणारे संदेश घेऊन आलो आहोत. ज्याचा उपयोग तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी करू शकता. (वाचा - महाशिवरात्र पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व घ्या जाणून)
ॐ नमः शिवाय…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
हर हर महादेव !
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
महाशिवरात्रीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा!
हर हर महादेव !
जय जय शिवशंकर
महाशिवरात्रीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा!
जय भोलेनाथ!
शिवरात्री हा भगवान शंकराची पूजा करण्याचा सर्वात मोठा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न केल्यास सर्व कार्य सफल होऊन सुख-समृद्धी येते. शिवभक्त शिवरात्रीच्या दिवशी अनेक प्रकारे भगवान शंकराची पूजा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला प्रसन्न करण्यासाठी शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते.