
Happy Holi 2024 Wishes In Marathi: दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी (Holi 2024) साजरी केली जाते. या दिवशी संपूर्ण देश गुलाल-अबीर आणि रंगांनी रंगून जातो. प्रत्येकजण एकमेकांवर प्रेमाच्या रंगांचा वर्षाव करतो. होळीचे रंगही प्रेमाचे प्रतीक मानले जातात. कृष्णनगरी मथुरेत होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळी हा हिंदूंचा सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपारिक सण आहे. सनातन धर्मात प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. होळी हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला वसंतोत्सव म्हणून साजरा केला जातो.
विष्णूच्या भक्तीचे फलित म्हणून हा दिवस सत्ययुगातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी लोक एकमेकांना होळी सणाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील Messages, Greetings, Quotes,WhatsApp Status द्वारे मित्र-परिवारास रंगाच्या सणाच्या शुभेच्छा पाठवू शकता. (वाचा - Shimga Utsav 2024: फाल्गुन पौर्णिमेला साजरा करण्यात येणार 'शिमगोत्सव'; काय आहे शिमगा सणाचे महत्त्व? जाणून घ्या)
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सावाचा साजरा
करू होळी संगे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

‘लाल’ रंग तुमच्या गालांसाठी,
‘काळा’ रंग तुमच्या केसांसाठी,
‘निळा’ रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
‘पिवळा’ रंग तुमच्या हातांसाठी,
‘गुलाबी’ रंग तुमच्या होठांसाठी,
‘पांढरा’ रंग तुमच्या मनासाठी,
‘हिरवा’ रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

पौराणिक कथेनुसार, भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूचा महान भक्त होता. वडील हिरण्यकश्यप यांना आपल्या मुलाची ही भक्ती अजिबात आवडली नाही. एकदा त्याने आपली बहीण होलिकासोबत प्रल्हादला मारण्याचा कट रचला. वास्तविक, होलिकेला असे वस्त्र लाभले होते की ती परिधान करून अग्नीत बसली तर ती अग्नीने जाळली जाऊ शकत नाही. तीच वस्त्रे परिधान करून होलिका प्रल्हादासोबत अग्नीत बसली. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने भक्त प्रल्हादला काहीही झाले नाही आणि होलिका आगीत जळून गेली. होळी हा सण वाईटावर चांगल्याचा आणि सत्तेवर भक्तीचा विजय म्हणून साजरा केला जातो.