Shimga Utsav 2024: कोकणात शिमगा (Shimga 2024) या नावाने ओळखला जाणारा होळी (Holi 2024) हा कोकणातील सर्वात प्रिय सणांपैकी एक आहे. यंदा 24 मार्च रोजी होळी म्हणजेचं शिमगा (Shimga) साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात कोकणात शिमगोत्सव (Shimgotsavam) मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. फाल्गुन मासामध्ये साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या दिवशी होळी पेटवून, तिला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून त्यात नारळाची आहुती देण्याची प्रथा आहे. तसेच पेटवलेल्या होळीला एकत्रित गलका करत हा सण साजरा केला जातो.
शिमग्यानिमित्त इतर राज्यात स्थायिक झालेले कुटुंबीय एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी आणि सण साजरा करण्यासाठी कोकणात परत येतात. या काळात कोकणातील प्रत्येकजण आपापल्या घरांचे नूतनीकरण करतो. होळी भारताच्या संपूर्ण उत्तर भागात, विशेषतः उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. होळी सणाच्या दिवशी लोक होळीभोवती पारंपारिक गाणी गातात, नाचतात आणि एकमेकांवर रंग लावतात. (हेही वाचा -Shimga 2024 Date: शिमगा कधी आहे? पंचांगानुसार होलिका दहनचा शुभ मुहूर्त घ्या जाणून)
विशेषत: कोकणात होळीचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. कोकणात होळीच्या सणाच्या दिवशी ग्रामस्थ देवदेवतांना पालखीत बसवतात आणि या पालखीची मिरवणूक काढली जाते. या उत्सवावेळी लोक नाचतात आणि पारंपारिक गाणी गातात. कोकणात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येतात. (वाचा - Shimga 2024 Date: शिमगा कधी आहे? पंचांगानुसार होलिका दहनचा शुभ मुहूर्त घ्या जाणून)
कोकणात शिमगोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कोळीबांधव आपापल्या होड्यांची पूजा करतात. या दिवशी कोळीबांधव पारंपारिक वेश परिधान करतात आणि होळीभोवती नृत्य सादर करतात. शिमगा हा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण उपवासही करतात. तसेच या दिवशी कृष्णाची आणि अग्नीची पूजा केली जाते.