Shimga 2024 Date: शिमगा कधी आहे? पंचांगानुसार होलिका दहनचा शुभ मुहूर्त घ्या जाणून
Shimga 2024 (PC - File Image)

Shimga 2024 Date: 'होळी' (Holi 2024) हा सण हिंदू संस्कृती आणि हिंदूंच्या सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. महाराष्ट्रात हा सण 'शिमगा' (Shimga 2024) या नावाने ओळखला जातो. हिंदी दिनदर्शिकेनुसार होलिका दहन हे फाल्गुन पौर्णिमेच्या प्रदोष काळात केले जाते. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात रंगांनी होळी खेळली जाते. रंगांच्या या पवित्र आणि आनंदाच्या सण होळीमध्ये प्रत्येकजण एकमेकांना रंग, अबीर आणि गुलाल उधळतो. या दिवशी लोक आपल्या प्रियजनांना शिमग्याच्या आणि होळीच्या शुभेच्छा देतात.

कधी आहे शिमगा?

यंदा होलिका दहन म्हणजेचं शिमगा 24 मार्च 2024 रोजी फाल्गुन पौर्णिमेला साजरा करण्यात येणार आहे. तसेच फाल्गुन शुक्ल प्रतिपदा तिथी 25 मार्च रोजीला होळी साजरी करण्यात येणार आहे. होळीचा सण देशात प्रथम उज्जैनच्या महाकालमध्ये साजरा केला जातो. यंदाही होळीच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. (हेही वाचा - Holi 2024 Date: या वर्षी होळीचा सण कधी साजरा होणार? हिंदू धर्मात या सणाला का आहे महत्त्व? जाणून घ्या)

होळी सणाची इतर नावे -

संपूर्ण भारतात होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनीही ओळखला जातो. होळीचा सण वसंतोत्सव, धुलेंडी, सिग्मो, शिमगा या नावाने देशभरात साजरा केला जातो.

हिंदू संस्कृतीच्या मान्यतेनुसार 'होलाष्टक' दरम्यान कोणतेही शुभ कार्य करणे निषिद्ध मानले जाते. यामागे अनेक पौराणिक समजुती आहेत. होलिका आणि प्रल्हाद यांच्या कथेशिवाय, होलाष्टकाशी संबंधित आणखी एक कथा देखील सर्वाधिक लोकप्रिय आहे.