
Mahashivratri 2023 Wishes in Marathi: हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाल्याची श्रद्धा आहे. या दिवशी भगवान शंकराची 12 ज्योतिर्लिंगे पृथ्वीवर अवतरली, असेही सांगितले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्रीचा उत्सव शनिवार, 18 फेब्रुवारी रोजी रात्री 08:03 वाजता सुरू होईल आणि रविवार, 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 04:19 वाजता समाप्त होईल.
महाशिवरात्रीची पूजा निशिता काळात होत असल्याने हा सण 18 फेब्रुवारीलाच साजरा करणे योग्य ठरेल. महाशिवरात्री निमित्त WhatsApp Status, SMS, Messages, Quotes द्वारा तुम्ही आपल्या मित्र-परिवारास मंगलमय दिवसाच्या खास शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा -Shiv Jayanti 2023: शिवभक्तांसाठी खुशखबर! शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी; शिवजयंतीच्या पाश्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय)
सर्व जग ज्याच्या शरणी आहे..
त्या भगवान शंकराला नमन आहे,
भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ,
चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…
हर हर महादेव!
शुभ महाशिवरात्री!

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची होवो एक नवी आणि चांगली सुरुवात,
हीच शंकराकडे प्रार्थना…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा...
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिव शंकरांचा महिमा अपरंपार!
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनंद देवो…
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

शिव सुंदर आहे,
शिव शक्ती आहे,
शिव भक्ती आहे,
महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!

यंदाचा महाशिवरात्री हा सण विशेष असणार आहे. यावेळी महाशिवरात्रीला त्रिग्रही योग तयार होणार आहे. 17 जानेवारी 2023 रोजी न्यायमूर्ती देव शनी कुंभ राशीत बसले होते. आता 13 फेब्रुवारीला सूर्य ग्रहांचा राजाही या राशीत प्रवेश करणार आहे. 18 फेब्रुवारीला शनि आणि सूर्याव्यतिरिक्त चंद्रही कुंभ राशीत असेल. त्यामुळे कुंभ राशीमध्ये शनि, सूर्य आणि चंद्र एकत्र त्रिग्रही योग तयार करतील. ज्योतिषांनी हा अत्यंत दुर्मिळ योगायोग मानला आहे.